परभणी,(प्रतिनिधी) : येथील पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट वैद्यकीय महाविद्यालयात एका 65 वर्षीय महिलेच्या पोटातून दहा किलोचा गोळा शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक 65 वर्षीय महिलेच्या पोटात सतत दुखत असल्याने त्यांनी आर. पी. हॉस्पिटल येथे शैल्यचिकित्सक डॉ. अमीर तडवी, डॉ. भीमराव कनकुटे यांना दाखवले. त्यावेळी त्यांनी केलेल्या सोनोग्राफी तपासणीमध्ये महिलेच्या पोटात दहा किलो वजनाचा गोळा तसेच गर्भपिशवी देखील खराब झाल्याचे आढळून आले, त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने हॉस्पिटलने तात्काळ महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेची परवानगी घेतली. दोन तासापेक्षा अधिक झालेल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून दहा किलोचा गोळा आणि गर्भपिशवी काढण्यात आली. त्यामुळे महिलेची प्राण वाचले.
दरम्यान, या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अमीर तडवी, डॉ. भीमराव कनकुटे, डॉ. श्रुती शहारे यांच्यासह कर्मचारी संध्या आळणे, किशोर नवले आदींनी परिश्रम घेतले. यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरपी हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


