पालम (प्रतिनिधी) दि.30 रोजी पालम तहसिल कार्यालय येथे रब्बी ई-पिक पाहणी बाबत सहायक यांचे प्रशिक्षणी ठेवण्यात आले होते त्यात पालम तहसिल कार्यालयच्या सभागृहमध्ये पालम तहिसलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली नायब तहसिलदार आर.एन.पवळे यांनी मास्टर ट्रेनर भाऊसाहेब चाळक व रमेश बनसोडे यांच्या कडुन सर्व उपस्थीत ग्राम महसुल अधिकारी, सहायक यांना ई-पिक पाहणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणास पालम तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी व पालम तलाठी संघटना अध्यक्ष कैलास आगळे व महसुल सहायक शेख इस्माईल, महसुल सेवक माधव कांबळे ईत्यादी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणात शेतक-यांनी दिनांक-1 डिसेंबर 2024 पासुन रब्बी हंगामातील ई-पिक पाहणी मोबाईल अँपवर नोंदणी करावी, तसेच 15 डिसेंबर 2024 पासुन पालम तालुक्यातील सर्व गावामध्ये शेतकरी ओळखपत्रासह 7/12 ला आधार जोडणीचे काम ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) करणार आहेत. येत्या तिन महीण्यात हा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे. यामुळे आता जमीनी बाबत सर्व व्यवहारातील आता फसवणुक टळणार आहे. होणारे व्यवहार हे पारदर्शक व शेतक-यांना ओटीपी व्दारे सुचीत करुन त्याची खातरजामा झाल्यावरच व्यवहार पुर्ण होतील अशा प्रकारे भुमी अभिलेख विभाग, कृषी विभागाच्या मदतिने अँग्री स्टॅक योजनेची अमलबजावणी करणार आहेत.


