परभणी (प्रतिनिधी) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या परभणी शाखेतर्फे रविवारी तालुक्यातील श्रीक्षेत्र त्रिधारा या ठिकाणी भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
अमावस्येनिमित्त येथील ओंकारनाथ मंदिरात दर्शनाकरीता येणार्या हजारो भाविकांकरीता हे शिबीर प्रामुख्याने आयोजित करण्यात आले असून सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच अवयवदानाविषयी जनजागृती व रक्तदानही केले जाणार आहे. भाविकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी परिषदेने केले आहे.


