परभणी,(प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नूतन विद्या समितीद्वारे कै. ह.ब. दळवी स्मृतिदिनानिमित्त 5 डिसेंबर रोजी विभागीय शालेय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धा परभणीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
नूतन विद्या समितीच्या शिवाजी नगरातील मराठवाडा हायस्कूलच्या रुद्रावतार मदनलाल धिंग्रा सभागृहात 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता या वक्तृत्व स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष, मराठी आमची गौरवशाली राज्यभाषा व गोमाता-राज्यमाता हे तीन विषय स्पर्धकांसाठी असणार आहेत. प्रथम विजेत्यास 2001, द्वितीय 1501 तर तृतीय विजेत्यास 1001 तर उत्तेजनार्थ 501 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
स्पर्धा आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून प्रत्येक विद्यार्थ्यास 5 मिनीटे वेळ दिला जाणार आहे. एका शाळेतून दोनपेक्षा अधिक स्पर्धक असू नयेत, विषयाची मांडणी मराठी भाषेतूनच करावी लागणार आहे. 50 पेक्षा अधिक स्पर्धक झाल्यास स्पर्धा 6 डिसेंबर म्हणजे दुसर्या दिवशी घेण्यात येईल. स्पर्धकांनी 3 डिसेंबर पर्यंत स्पर्धा संयोजक गोपाळ रोडे (9028149855) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी.
या स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन नूतन विद्या समितीचे चिटणीस संतोष धारासूरकर, सहसचिव तथा मुख्याध्यापक अनंत पांडे व स्पर्धा संयोजक गोपाळ रोडे यांनी केले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


