परभणी ( प्रतिनिधी) येथील जेष्ठ नागरिक रमेशराव बाळकृष्ण सोनवणे (वय ८४) यांचे दि. २ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता निधन झाले. उद्या मंगळवार दिनांक ३ रोजी सकाळी ठीक १० वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी,परभणी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी राजू सोनवणे व अनिल सोनवणे यांचे वडील होत.
दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.


