परभणी (प्रतिनिधी) गुरुवार 5 डिसेंबर रोजी बाल विद्यामंदिर हायस्कूल च्या नानल पेठ व वैभव नगर शाखेत भव्य शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नानल पेठ विभागात बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. एन.ए.झरकर साहेब व वैभव नगर विभागात बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव डॉ.विवेक नावंदर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक आर.जी.तुम्मेवार, पर्यवेक्षक पी.व्ही. रुघे, बी.के.कोपरटकर व पर्यवेक्षिका सौ.एस.एम. बोके उपस्थित होत्या.या प्रदर्शनात वर्ग सहावी ते आठवीच्या गटामधून 102 प्रयोग व वर्ग नववी ते बारावीच्या गटातून 25 प्रयोग असे एकूण 127 प्रयोग मांडण्यात आले होते.या प्रदर्शनाचे परीक्षण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक करनाडे , डॉ.श्री.मोरे , सौ. अग्रवाल व सुरवसे यांनी केले. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेच्या दोन्ही शाखेतील सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले.



