परभणी(प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर, विभाग स्तर, राज्यस्तर स्पर्धा पार पडल्या यामध्ये खो-खो, जिम्नास्टिक, उशु ,स्क्वॅश, कुस्ती, टेबल टेनिस ,आर्चरी, कराटे ,सायकलिंग, बुद्धिबळ अशा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बाल विद्यामंदिर हायस्कूल वैभव नगर शाखेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केलेआहे.
यामध्ये टेबल टेनिस या खेळामध्ये चि.अनुज कवठेकर , अवधूत कोठेकर या खेळाडूंनी राज्य स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलेआहे आणि चि.अनुज कवठेकर याची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी १४ वर्ष वयोगटातील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.तर राज्य टेबल टेनिस स्पर्धेत चि.श्रीपाद कोठेकर याची निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे आर्चरी स्पर्धेत कु.संस्कृती गायकवाड ही राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली आहे.
कु.दिव्या आवाड हिने जिनमॅस्टिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावून तिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
तर राज्य स्पर्धेत चि.हर्षद जाठोडे आणि गौरव आवाड यांची निवड झाली आहे.त्याचप्रमाणे प्रशालेच्या मुलांच्या खो-खो संघाने विभागीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे.या संघामध्ये प्रणव पैठणे (कर्णधार) कृष्णा शर्मा ,विश्वजित भिसे, सत्यजित पवार , प्रज्वल डाड,श्रीनिवास दुधाटे, अस्मित पवार, अभिराज रोडगे, सोहम पांचाळ, पृथ्वीराज देसाई ,कौस्तूभ गुंगे,सार्थक वैद्य,आदेश लोणारी,अभंग देशमुख, सर्वेश बोर्डे या खेळाडु चा समावेश होता,तर मुलींच्या संघात वेदिका अंभोरे(कर्णधार) कल्याणी हानेगावकर,राजनंदिनी देसाई,आराध्या रोडगे,हिंदवी यादव, खुशी भरोसे, राशी भरोसे, वेदिका मुंढे,तन्वी काळे, निकिता कदम, पूनम जावळे, शरयू साबळे, स्वरा मोरे,वसुंधरा पवार, धनश्री यादव या खेळाडूंनी विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे त्याचप्रमाणे कराटेमध्ये सिद्धी धानोरकर व साधना बाभूळगावकर.स्क्वॅश मध्ये आयुष लोनसणे, आर्चरी मध्ये चि.तेजस शिंदे यांची विभागीय निवड झाली.तर कुस्तीमध्ये समर्थ पवार, सायकलिंग मध्ये गोविंद खटिंग बुद्धिबळ मध्ये.कु हिंदवी यादव चि.देव फाळके, जिम्नास्टिक मध्ये विभागीय स्पर्धेसाठी स्वराज राजुरे याची निवड झाली. तसेच उशू, किक बॉक्सिंग, जुडो , आणि कराटे मध्ये राधिका शिंदे हिने विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. वरील सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेचे क्रिडा शिक्षक.पी.पंडीत एस.बी.देशमुख प्रभाकर गमे यांचे संस्थाअध्यक्ष डॉ.एन.ए.झरकर ,उपाध्यक्ष ॲड.विलासजी पोहंडुळकर साहेब,सचिव डॉ.विवेकजी नावंदर ,सर्व संचालक मंडळ,प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक आर.जी.तुम्मेवार , पर्यवेक्षक पी.व्ही.रुघे ,बी.के.कोपरटकर सर,पर्यवेक्षिका सौ.एस.एम.बोके मॅडम यांनी वरील सर्व खेळाडूंचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.


