परभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल, परभणी या शाळेत 26डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण बोराडे,तर प्रमुख पाहुणे म्हणून वीर बालकांच्या वेशभूषेतील जोरावर सिंग यांच्या वेशातील कु.सिद्धी धानोरकर आणि फतेह सिंगांच्या वेशातील कु.साधना बाभुळगावकर ह्या विद्यार्थिनी होत्या.
या प्रसंगी सुमेधा साबळे, अनुप देशमुख,अविष्कार गोरे,शौर्य कदम,शिवराज कदम,अथर्व रेंगे,शिवम काटकर,स्वराज जाधव आणि प्रतीक गुंगे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्ती पत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सुमेधा साबळे हिने आपले मनोगत व्यक्त केले.वीर बाल दिवसाचे औचित्य साधुन जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या बलिदानाची शौर्य गाथा सुंदर नाटिकेतून सादर करण्यात आली.

या नाटिकेमध्ये- श्रद्धा पुरी, गार्गी कुलकर्णी,ईश्वरी पारवे ,दक्षा धानोरकर, सिद्धी धानोरकर ,वेदिका शिंदे,अक्षदा शिरगदवार , प्रिया पामे,साधना बाभुळगावकर,जीविका मुढेआणि गौरी देशमुख या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर अभिनय करत बालविरांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग सादर केला.अध्यक्षीय समारोपाच्या भाषणामध्ये अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसमोर वीर बाल दिवसाचा इतिहास कथन करून विद्यार्थ्यांनी समर्पण, त्याग व सेवावृत्ती अंगिकारावी या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करणारे श्री आठवा एच चे वर्ग शिक्षक अजित देशपांडे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.मुख्याध्यापकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानवी डफुरे, आदिती खरवडे,ऋतुजा जोगदंडआणि शुभांगी बेटकर यांनी तर रिद्धी किल्चे आणि तेजल गडदे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद ,पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



