परभणी,(प्रतिनिधी) : सदस्य नोंदणी अभियानातून या जिल्ह्यात नवीन दोन लाख सदस्य नोंदणीचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या पुढार्यांनी निरीक्षकांसह संघटनमंत्र्यांसमोर सोडला.
सदस्य नोंदणीच्या पार्श्वभूमीवर येथील आयएमएच्या सभागृहात शनिवार 28 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, तसेच प्रदेश सचिव राहुल लोणीकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, प्रदेश प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख, जिल्हा महामंत्री सुभाष आंबट, डॉ. केदार खटींग, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विलास बाबर, शिवाजीराव मव्हाळे, शशिकांत देशपांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक पदाधिकार्याने या जिल्ह्यात सदस्य नोंदणीचे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्याचा संकल्प सोडला. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत भाजप व इतर मित्रपक्षांना पूरक असे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सदस्य नोंदणीकरीता निश्चितच सर्वार्थाने प्रयत्न करावेत, असे आवाहनसुध्दा यावेळी मान्यवरांनी केले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


