परभणी (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित सकस आहार , व्यायाम व खेळ याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनाचा व बुद्धीचा सर्वांगीण विकास होतो. शारीरिक , मानसिक व बौद्धिक विकासाच्या बळावर विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. यासाठी पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घ्यावा. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयरुपी आकाशाला गवसणी घालायची असेल तर शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी सज्ज राहिले पाहिजे. असे प्रतिपादन समुपदेशक प्रविण सोनोने यांनी केले.
शहरातील बाल विद्यामंदिर प्राथमिक शाळेत *सखी सावित्री समितीच्या* वतीने आयोजित कार्यक्रमात प्रशालेतील ज्येष्ठशिक्षक तथा समुपदेशक प्रविण सोनोने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सिंधू शर्मा या होत्या. यावेळी नानलपेठ विभाग प्रमुख सौ. सुनीता जाधव , सकाळ सत्र पर्यवेक्षिका सौ. रोहिणी जोशी आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा निकम यांनी केले.तर आभार रोहिणी जोशी यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


