परभणी (प्रतिनिधी) स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवस, रात्र रुग्णसेवेत केवळ नौकरी म्हणुन नव्हे तर संकट काळात सामाजिक बांधिलकी म्हणून परिचारिका काम करत असतात हे कोरोना काळात अनुभवले आहे. आजही त्याच निष्ठेने त्यांचे कार्य सुरु आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नागेश लखमावार यांनी केले.
येथील धनेश्वरी मानव विकास मंडळ संचलित परभणी नर्सिंग कॉलेज बी.एसस्सी. नर्सिंग विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण समारंभ दि.२ जानेवारी रोजी परभणी मेडिकल कॉलेज येथे पार पडला. यावेळी डॉ. लखमावार बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तथा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, पेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कदम, डॉ.जयदेव उघडे, डॉ. गुरुनाथ बिराजदार, प्राचार्य एस आरती उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. लखमावार यांनी परिचारिकांच्या कार्याचा आढावा घेतला. नर्सिंग क्षेत्राशी जोडल्या जाणाऱ्या परिचारिका सर्वात आधी रुग्णांच्या अहारोत्र सेवेची प्रतिज्ञा घेतात. ज्याप्रमाणे जगातील पहिल्या परिचारिका प्लेरेन्स नाइटिंगेल यांनी मेणबत्ती घेऊन रुणांची सेवा केली त्याचप्रमाणे आपण देखील रुग्णांची सेवा करुन त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करू व त्यांना प्रकाशाकडे नेऊ यासाठी शपथ घेतली जाते असे सांगीतले.
यावेळी प्राचार्य एस.आरती यांनीही मार्गदर्शन केले. नर्सिंग महाविद्यालयात उत्तम प्रकारच्या परिचारिका घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सेवाभावी वृत्तीने रुग्णांची सेवा करणाºयांची वृत्ती नवीन पिढीत वृधींगत करायला हवी असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी विशाल आहेर, प्रा. ऋषिकेश गायकवाड, प्रा.गायत्री वाघमारे, प्रा.क्षितिजा रोडे, प्रा. सुप्रिया वाघ, सौरभ कुलथे आदींनी पुढाकार घेतला.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


