परभणी (प्रतिनिधी) सन 2025 चा मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे दिला जाणारा कै.यशवंत पाथ्ये स्मृती पुरस्कार भूषण मोरे यांना पत्रकारिता क्षेत्रात भरीव आदर्श कार्यासाठी जाहीर करण्यात आला आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या 24 व्या वर्धापनात दिनानिमित्त पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.भूषण मोरे हे मागील 24 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्य करत असून या माध्यमातून ते जनतेची सेवा करतात सध्या ते परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे समन्वयक आहेत.सदरची निवड झाल्याचे पत्र मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी पाठविले असून पुरस्कार वितरण हे दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी दर्पण दिनी सायंकाळी 4 वा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय डॉ. सुरेंद्र गावस्कर सभागृह दादर मुंबई येथे होणार आहे.या निवडीने भूषण मोरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


