परभणी,(प्रतिनिधी) निरनिराळ्या व्याधी पासून बचाव करण्यासाठी लसीकरण करणे हा उत्तम पर्याय आहे असा सूर परभणी मेडिकल कॉलेज येथे तरुणांचे लसीकरण काळाची गरज व बदलते स्वरूप या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेत उमटला.
वैद्यकीय क्षेत्रात दररोज नव्या ज्ञानाची भर पडते त्याचा वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टरांना फायदा होतो त्यासाठी वैद्यकीय निरंतर शिक्षणासारख्या परिषदांना बाहेर ठिकाणी जाऊन तेथे हजेरी लावणे बंधनकारक आहे,परंतु सर्वच परिषदांना हजेरी लावणे डॉक्टरांना शक्य होत नाही यामुळे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाने नुकतीच प्रौढांचे लसीकरण काळाची गरज व बदलते स्वरूप या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजगोपाल कालानी व्यासपीठावर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमीर तडवी यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र वैद्यकीय मंडळाकडून डॉ.अभिजीत चित्रकार यांची पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होती. या कार्य शाळेसाठी परभणी व राज्यभरातून 181 डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. जगभरातील इतर देशांमध्ये नागरिकांप्रमाणे भारतातील नागरिकांना देखील निरनिराळ्या व्याधीना सामोरे जावे लागते या व्याधींच्या उपचारासाठी वेळ आणि खर्च करावा लागतो मुळातच या व्याधी उद्भवणे यासाठी लसीकरण उपलब्ध असल्याचे लोकांना बहुतेक वेळी माहित नसते लहान मुलांच्या निराळ्या व्याधी पासून बचाव करण्यासाठी लस उपलब्ध असते त्याचप्रमाणे प्रौढांसाठी अनेक व्याधीपासून बचाव करण्यासाठी लस्सी उपलब्ध आहेत परंतु याबद्दल फारशी माहिती नसल्याने या लसीचा उपयोग केला जात नाही लसीकरण केवळ लहान मुलांसाठीच असल्याची बहुतांश लोकांना समज आहे उत्तम आरोग्यासाठी लसीकरण हा एक पर्याय आहे असा सूर यावेळी उमटला या कार्यशाळासाठी डॉ.मोमीन काशीफ यांनी प्रवाशांसाठी लसीकरण डॉ.किरण सगर यांनी प्रौढ विरुद्ध मुलांमध्ये लस्सींच्या प्रतिसादातील जैविक फरक डॉ.दमकोंडावार यांनी एचपी व्ही लसीकरण विस्तारित संकेत आणि कर्करोग प्रतिबंध डॉ. रोहन बेंबडे यांनी अँटी रेबीज लसीकरण, डॉ. कृष्णप्रिया सिकची यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जयदेव उघडे, गुणवंत आहेरे आदींनी परिश्रम घेतले.


