परभणी(प्रतिनिधी) -परभणी ते गंगाखेड रोड येथिल रेंगे फायन्स ते ब्रम्हणगांव या रस्त्यावर दिनांक 29 डिसेंबर रोजी आपघाताची घटना घडली होती.त्या घटनेत मयत सुरजद गंगाधर जाधव यांचा 1 जानेवारी रोजी खाजगी रुग्णालयात मृत्यु झाला होता.परंतु हा आपघात नसुन घातपात आसल्याचा आरोप नातेईवाकांनी केला होता.या पार्श्वभुमिवर लालसेनाच्या वतीने आज बुधवार 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी,अपर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना संबंधी आरोपीना तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी लालसेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळानी निवेदन देण्यात आले असुन या घटनेच्या निषेधार्था दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा काढण्यात येणार आसल्याची माहिती लालसेनाचे प्रमुख काॅ.गणपत भिसे यांनी दिली.यावेळी मयत सुरज गंगाधर जाधव यांच्या मारेकर्यांना तात्काळ अटक करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लालसेनाचे प्रमुख काॅ.गणपत भिसे,सुरजची आई बबिता जाधव,बहिण ,पत्नी पुजा सुरज जाधव,राम गायकवाड,नागेश गायकवाड,लालसेनाचे अशोक उबाळे,मातंग समाजाचे नेते मनोहर गवारे,जनाबाई वैरागड यांनी केली आसुन निवेदनावर सर्वाचे स्वाक्षरी आहेत. (छाया- संजय घनसावंत)


