परभणी (प्रतिनिधी) प्राथमिक शिक्षण विभागाला अंधारात ठेऊन परभणीतील शिक्षण संस्था आर टी ई २५% मधील पूर्व प्राथमिकचे तीन वर्ग वगळल्या जात आहेत.तातडीने पूर्व प्राथमिक तीनही वर्गाचा समावेश करावा या मागणीचे निवेदन दिले.मागणी मान्य न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना परभणीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक यांनी प्राथमिक शिक्षण विभाग, जि.प. परभणीचे , शिक्षणधिकारी यांना निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिक्षण विभागाला अंधारात ठेऊन परभणीतील शिक्षण संस्था आर टी ई २५% मधील पूर्व प्राथमिकचे ३ वर्ग वगळत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. शासन परिपत्रकानुसार आर टी ई २५% अंतर्गत प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. संबंधित संकेत स्थळावर आजपर्यंतचे सर्वच शासन निर्णय किंवा शिक्षण विभागाचे परिपत्रक पाहिलेले तर असे निदर्शनास येते की पूर्व प्राथमिकच्या ३ वर्षासाठी बालकांची वयोमर्यादा किंवा अन्य नियमावली निश्चित केलेली आहे. पण काही वर्षांपासून परभणी जिल्हयातील शिक्षण संस्था ह्या जाणून बुजून पूर्व प्राथमिक वर्गासाठी आपल्याकडे नोंदणी करत नाहीत. ह्यात पूर्व प्राथमिक वर्गासाठी मनमानी शुल्क आकारण्यासाठी शिक्षण विभागासोबत केलेली तडजोड आहे असा आरोप करत नोंदणी केलेल्या सर्व शिक्षण संस्था तसेच जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी यांची तात्काळ बैठक बोलावून ह्या विषयात गांभीर्याने कारवाही करण्यात यावी. त्याच बरोबर २०२५-२६ या प्रवेश प्रक्रियेत पूर्व प्राथमिक चे ३ वर्षाची नोंदणी सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना केली आहे. या मागणीवर विचार करुन प्रश्न निकाली काढण्यात यावा अन्यथा प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालय समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना परभणीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन लक्ष्मीकांत टाक यांनी सांगितले आहे.


