पालम (प्रतिनिधि) राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेंतर्गत लाभार्थी यांना अर्थसहाय्य वितरण जानेवारी २०२५ पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन स्तरावरून डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तहसीलमध्ये सादर करण्याचे अवाहन पालम चे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी केले.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी यांनी आधार कार्ड, बँकेशी संलग्न मोबाइल नंबर,बँक पासबुक,हयात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला याबाबत आवश्यक कागदपत्रे संबंधित गावातील तलाठी किंवा संबंधित तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करावीत. तसेच,आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे,ज्या लाभार्थ्यांनी वरील कागदपत्र सादर केली नाहीत, त्यांचे निवृत्ती वेतन फेब्रुवारी २०२५ पासून शासन स्तरावरून अदा करण्यात येणार नाही, अशा सूचना आहेत.त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन व संजय गांधी निराधार अनुदान योजनांचे दोन्ही अर्थसाहाय्याचे वितरण थेट लाभार्थ्यांनी त्यांचे आधार संलग्नीकृत बँक खात्यात पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी वरील आवश्यक ती कागदपत्रे संबंधित गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करावी.


