परभणी (प्रतिनिधी)3 डिसेंबर 1939 रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली.. मराठी पत्रकार परिषदेचा हा स्थापना दिवस राज्यात गेली दहा वर्षे “पत्रकार आरोग्य दिन” म्हणून साजरा केला जातो..या दिवशी स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात.. गंभीर आजाराचा रूग्ण सापडल्यास त्यास मुंबईस पाठवून त्याच्यावर उपचार केले जातात.. गेल्या वर्षी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांना राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.. राज्यातील 265 तालुक्यात ही शिबिरं झाली.. त्यात 10,000 पेक्षा जास्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली.. हा जागतिक विक्रम होता.. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे 3 डिसेंबर 2024 रोजी राज्यात पत्रकार…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) संविधान दिना निमित्त आज मंगळवार दि.26 रोजी परभणी शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त निमिनाथ दंडवते, उपायुक्त बबन तडवी, मुख्य लेखाधिकारी डॉ.प्रभाकर काळदोते, लेखा परिक्षक डॉ. श्रीरंग भुतडा यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान दिना निमित्त अधिकारी, कर्मचारी समवेत संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले. यावेळी म.न.पा.लेखाधिकरी भगवान यादव, मुरारजी, सावंत, नगर सचिव विभागाचे विकास रत्नपारखे, संकिर्ण विभाग राजकुमार जाधव, शिक्षण विभाग मंजुर हसन, पाणी पुरवठा विभाग तन्वीर बेग, अदनान कादरी, माहीती व जनसंपर्क विभाग उमेश जाधव, कर्मचारी संघटना अध्यक्ष के.के.आंधळे, शेख मैहमुद, लेखा विभागचे रमेश चव्हाण, आदी अधिकारी, कर्मचारी मोठ़या संख्येने…
पालम(प्रतिनिधी) वैराग्यमूर्ती ब्रह्मनिष्ठ सदगुरु श्री बाळकृष्ण महाराज यांची 121 वी पुण्यतिथी पर्वकाळ निमित्त पालम येथे अखंड हरिनाम सप्ताह चातुर्मास समाप्ती ज्ञानेश्वरी पारायण श्री दत्त याग व श्री मदभागवत कथा दिनी ज्ञानयज्ञ सोहळा प्रारंभ आज दिनांक 25 नोव्हेंबर 2024 सोमवार रोजी कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दैनंदिन कार्यक्रम काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण व भागवत पठण गाथा भजन भागवत कथा व प्रवचन धूप आरती हरी कीर्तन हरीजागर सदरील कार्यक्रमास गाथा प्रमुख हभप मंचक महाराज गोळेगावकर हभप दत्ता महाराज पिंपरीकर , ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख हभप शाहूराव महाराज पत्की कीर्तन वीणाप्रमुख हभप अण्णा महाराज सर्फराजपूरकर हभप नामदेव गुरुजी पालमकर , दिनांक 25 नोव्हेंबर 2024 सोमवार रोजी हभप श्री…
सेलू : (प्रतिनिधी) श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. याच दिवशी देशांमध्ये संविधान लागू करण्यात आले होते. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्राचार्या प्रा. प्रगती क्षीरसागर व सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नूतन कन्या प्रशालेत संविधान दिन साजरा सेलू (प्रतिनिधी) भारतीय संविधानाने आपल्याला जशी मुलभूत अधिकार दिली आहेत. तशीच कर्तव्यही दिली आहेत. तेव्हा विद्यार्थी आणि नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या मुलभूत अधिकारासह कर्तव्याची जाणीवही ठेवावी. एक आदर्श आचारसंहिता असलेले भारतीय संविधान हा मानवतावादी धर्म ग्रंथ आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. ते श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने शासनाच्या ‘ हर घर संविधान ‘ उपक्रमांतर्गत मंगळवार ( दि. २६ ) रोजी आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक निशा पाटील या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे…
परभणी, (प्रतिनिधी) जायकवाडी कालव्यातून रब्बी हंगामासाठी ३ व उन्हाळी हंगामासाठी ४ पाणी आवर्तनांना तसेच निम्न दुधना कालव्यातून रब्बी हंगामासाठी ३ पाणी आवर्तन व उन्हाळी हंगामासाठी ३ पाणी आवर्तनांना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी कळविले आहे. जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी डावा कालवा व निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून पाणी आवर्तन सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक पार पडली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार आज २५ नोव्हेंबर रोजी जायकवाडी व दि. २६ नोव्हेंबर २०२४ निम्न दुधना प्रकल्पाचे कालव्यातून पाणी सोडण्यात…
परभणी, (प्रतिनिधी) नेहरु युवा केंद्र कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 12 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान दिल्ली येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, दि. 5 डिसेंबर 2024 पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे. एक लाख युवा नेत्यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण व्हावे, त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी असू नये, असे युवा नेते या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडण्याचे प्रधानमंत्र्यांचे व्हीजन आहे. या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमात निवड झालेल्या नेत्याला 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी प्रधानमंत्र्यांसमोर आपले विचार, कल्पना आणि मत मांडू शकणार आहेत. युवा नेता निवडीसाठी 15 ते 19 वर्षे वयाची मर्यादा असून, त्याने एमवाय डॉट जीओव्ही डॉट इनवर ऑनलाईन…
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले रब्बी- उन्हाळी पाण्याचे नियोजन छत्रपती संभाजीनगर, – छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जायकवाडी प्रकल्प, नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प (येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्प), मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्प, सिना कोळेगाव प्रकल्प या नऊ मोठया प्रकल्पावरील सिंचन तसेच पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची (शासकीय सदस्यांची) बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी दूरदृष्य प्रणालीव्दारे सबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच सबंधित…
परभणी (प्रतिनिधी) AR STUD FARM च्या वतीने आज रविवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता परभणी शहरातील लक्ष्मी नगरी येथे देशपातळीवरील घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ए.आर स्टुडं फर्मच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य मैदान तयार करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना पहिल बक्षीस 81 हजार रोख , 500 ग्राम चांदी मेडल , दुसरं बक्षीस 61 रोख, 300 ग्राम चांदी मेडल, तिसर बक्षीस 41 रोख , 200 ग्राम चांदी मेडल आणि प्रोत्साहन पर अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,खासदार संजय जाधव , आ. डॉ राहुल पाटील , महाराष्ट्रातील…
परभणी जिल्हयातील चार विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल जाहीर परभणी, (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत परभणी जिल्ह्यातील 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघातून बोर्डीकर मेघना दिपक साकोरे (पक्ष-भारतीय जनता पार्टी), 96-परभणी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहूल वेदप्रकाश पाटील (पक्ष-शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), 97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून गुट्टे रत्नाकर माणिकराव (पक्ष-राष्ट्रीय समाज पक्ष), 98-पाथरी विधानसभा मतदारसंघातून राजेश उत्तमराव विटेकर (पक्ष-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी) हे विजयी झाले. विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांचे नाव, पक्ष व त्यांना मिळालेली मतांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघ- अनिल बन्सी चव्हाण (बहुजन समाज पार्टी)-692, बोर्डीकर मेघना दिपक साकोरे (भारतीय जनता पार्टी)-113432, भांबळे विजय माणिकराव (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)-108916, नागरे सुरेश कुंडलिकराव (वंचित बहुजन आघाडी)-56474, डॉ.…

