Author: Lok Sanchar

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे- पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी परभणी जिल्ह्यात मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज परभणी, (प्रतिनिधी)विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी, (दि.20) मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सांयकाळी 6.00 पर्यंत आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. तर मतदानाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.…

Read More

सेलू (प्रतिनिधी) येथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी रांगोळी उपक्रमातून सोमवार ( दि.१८ ) रोजी मतदार जनजागृती करण्यात आली. रांगोळी उपक्रमास शहरात शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावंडे , जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी , तहसीलदार डॉ. शिवाजी मगर , गटशिक्षणाधिकरी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनात सेलू गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी शहरातील नूतन विद्यालय, ज्ञानतीर्थ विद्यालय , यशवंत विद्यालय , न्यू हायस्कुल , के.बा. विद्यालय , नूतन इंग्लिश स्कुल , के.जी.बी.व्ही शाळा , विवेकानंद प्राथमिक विद्यालय , यासेर उर्दू शाळा…

Read More

परभणी,(प्रतिनिधी)— विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्हयातील परभणी, गंगाखेड, जिंतूर व पाथरी या विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात कर्मचारी आज रवाना झाले. परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ठेवण्यात आलेले मतदान साहित्य परभणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सकाळीच कर्मचारी आले होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : येथील पाथरी रोडवरील एस.डि.मेसॉक फाउंडेशन संस्थेच्या सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालय व पोस्ट ग्रॅज्युऐट रिसर्च सेंटर मध्ये 12 नोव्हेंबर रोजी बी.डी.एस. या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या 100 विद्यार्थ्यांचा स्वागत व व्हाईट कोट सेरेमनी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष व संचालक डॉ. प्रफुल्ल पाटील व संचालिका डॉ. सौ. विद्या प्रफुल्ल पाटील उपस्थितीत होते. संस्थेच्या बी.डी.एस. (100 विद्यार्थी क्षमता), एम.डी.एस.(28 विद्यार्थी क्षमता), डॉ. प्रफुल्ल पाटील बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालय (60 विद्यार्थी क्षमता) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे या सोहळ्याद्वारे स्वागत करण्यात आले. दंत शल्यचिकित्सा या वैद्यकीय शाखेच्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचा आगळा-वेगळा पायंडा डॉ.प्रफुल्ल पाटील यांनी…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी परभणी जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यामधील 95-जिंतूर, 96-परभणी, 97-गंगाखेड व 98-पाथरी या चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर, 2024 रोजी बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याकरिता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील चारही मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदानाचे दिवशी मतदान केंद्राचे…

Read More

वालुर (प्रतिनिधी) येथील रहिवासी श्रीकिशन बसप्पा चिलवंत यांचे सोमवार दि 18 रोजी दुपारी 4 वाजता निधन झाले. मृत्यूसमयी ते 89 वर्षाचे होते. त्यांच्यावर उद्या मंगळवारी दि 19 रोजी सकाळी 10 वाजता वालुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे आहेत.

Read More

पालम (प्रतिनिधी) विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदाना वेळी मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांसाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यावर मतदारांना मतदान करता येईल, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सदरील पुरावे ग्रहय धरले जाणार असल्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आव्हान पालम तहसीलदार तथा सहायक निवडणूक अधिकारी माहिती दिली आहे. मतदार ओळख पत्रावर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र मतदार यादीत नाव असूनही ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अशांसाठी १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदाराने पत्त्यात बदल केला असेल तर मात्र नवे ओळखपत्र मिळाले नसल्यास माहितीच्या ओळखपत्रावर मतदान करता येईल. मात्र…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी आज टपाली मतदान सुविधेच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परभणी येथील तहसिल कार्यालयातील टपाली मतदान सुविधा केंद्रात श्रीमती माथुर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे आपले हक्क व कर्तव्य आहे. भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने दि. 20 नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले. ***

Read More

परभणी, (प्रतिनिधी):- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारु, पैशाची वाहतूक रोखण्यासाठी एसएसटी व एफएसटी पथकांमार्फत जिल्हयात वाहनांची तपासणी केली जात आहे. आज स्वत: निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल यांनी एफएसटी पथकाच्या माध्यमातून इतर वाहनांसोबतच पोलीसांच्या वाहनांचीही तपासणी केली. जिंतूर विधानसभा मतदारसंघात पाहणीच्या वेळी श्री. दुग्गल यांनी सदर तपासणी केली. यावेळी त्यांनी परभणी-हिंगोली जिल्हयाच्या सीमेवरील एसएसटी व एफएसटी पथकांना भेट देऊन मार्गदर्शन केले. दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाला काही अवधीच शिल्लक राहिला आहे, त्यामुळे पथकांनी अधिक दक्ष राहावे. वाहनांची काळजीपूर्वक तपासणी करावी. वाहनांमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, अशी सूचना पथकातील कर्मचाऱ्यांना त्यांनी यावेळी केली. श्री. दुग्गल यांनी…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आज अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी टपाली मतदान सुविधेच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक मत हे अमूल्य आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदान हे केलेच पाहिजे. मतदानाचा आपला अधिकार बजावणे आवश्यक आहे. मी मतदान केले आहे, आपणही मतदान करावे. बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी सर्व मतदार विशेषत: नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन डॉ. काळे यांनी सर्व मतदारांना केले आहे. परभणी येथील तहसिल कार्यालयातील टपाली मतदान सुविधा केंद्रात डॉ. काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासमवेत निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी,…

Read More