Author: Lok Sanchar

लम (प्रतिनिधी ) गंगाखेड विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने गेल्या दोन ते तीन दिवसा पासुन शहरासह तालुक्यातील शेखराजुर, पारवा, पेठशिवणी, चाटोरी, बनबस आदी गावासह शहरातील पठाण गल्ली, रोकडे गल्ली, सिरस्कर गल्ली, टेक गल्ली, ब्रम्हण गल्ली, नवा मोंढा, बस्टेशन आठवडी बाजार, शहराती मेन चौक या भागातुन पालम पोलिसांनी संयुक्तरित्या पथसंचलन केले. या वेळी पालम पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक सुरेश थोरात सह सशस्त्रधारी बि.एस.एफ चि तुकडी व पोलिस कर्मचारी सतीश दोंनकलवार, गणेश सवंडकर, के.एस.देवघरे, जमादार कल्यान साठे,विलास बळवते,शंकर कोलमवाड,बाबु सिंघनवाड आदी होते. निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पालम पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे.

Read More

सेलू (प्रतिनिधी) श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल व ऑल महाराष्ट्र वूशु असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय 21वी सब ज्युनिअर व 22 ज्युनिअर /युथ मुले मुली राज्यस्तरीय वूशू अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सुमारे 900 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तावलू या क्रीडा प्रकारामध्ये सब ज्युनिअर गटातून प्रथम मुंबई सिटी द्वितीय कोल्हापूर व तृतीय नागपूर. तर ज्युनिअर गटामध्ये प्रथम पुणे, द्वितीय ठाणे व तृतीय कोल्हापूर. सांसु या क्रीडा प्रकारात सब जुनिअर गटातून प्रथम संभाजीनगर, द्वितीय धुळे व तृतीय नागपूर. तर जूनियर गटातून प्रथम छत्रपती संभाजीनगर,…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त विशेष निवडणूक निरीक्षक (पोलीस) दिपक मिश्रा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी आणि हिंगोली जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदान व मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीची मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस यंत्रणा व संबंधितअधिकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीस निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांच्यासह, परभणी, गंगाखेड, पाथरी व जिंतूर विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. तर व्हीसीव्दारे हिंगोली येथून निवडणूक…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जास्तीतजास्त मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, यासाठी स्वीपच्या माध्यमातून परभणी शहरात आज सकाळी काढण्यात आलेल्या मतदार जनजागृती सायकल रॅलीस विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी कार्यालय येथून सकाळी सायकल रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक संचिता बिष्णोई, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. रॅलीच्या समारोप ठिकाणी सदर मान्यवरांसह निवडणूक निरीक्षक (खर्च) राहूल मिश्रा उपस्थित होते. मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी व निवडणूक निरीक्षकांनी केले. उपजिल्हा…

Read More

परभणी : शहरातील खानापूर परिसरातील पवनपुत्र कॉलनी येथील रहिवाशी उल्हास मंचकराव खटिंग (३७) यांचे शुक्रवार, १५ नोव्हेबर रोजी ४ वाजता संभाजीनगर येथे ह्दय विकाराने निधन झाले. त्यान्च्या पार्थिवावर आज दुपारी ३.३० वाजता खानापूर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यान्च्या पश्चात आई,वडील, दोन भाऊ,एक बहीण असा मोठा परिवार आहे.

Read More

पालम (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आरखेड येथील गिरजाबाई लक्ष्मणराव दुधाटे (गोळेगावकर) यांचे शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांच्या त्या पत्नी, गोदातीर समाचार चे संपादक ॲड.रमेशराव दुधाटे गोळेगावकर यांच्या चुलती, माजी सभापती श्रीमती चित्राताई दुधाटे गोळेगावकर यांच्या सासू आणि बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषारभैय्या गोळेगावकर, संचालक योगेश गोळेगावकर तसेच गिरीश सोळंके यांच्या आजी होत. त्यांच्या पार्थिवावर आज रविवार दिनांक-17 नोव्हेंबर रोजी दुपारी 1…

Read More

सेलू,(प्रतिनिधी)  सेलू तालुका क्रीडा संकुलास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा प्रकार पुढे आला आहे,सेलू तालुका क्रीडा कार्यालय व तालुक्यातील क्रीडा प्रेमी यांनी मागणी करूनही अजूनही साहित्याचा पुरवठा झाला नसून हे साहित्य परभणीतील एका वस्तीगृहात पडून असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे खेळाडू, क्रीडाप्रेमी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. सेलू येथे तालुका क्रीडा कार्यालय असून तालुका क्रीडा संकुल तसेच खोल्या देखील बांधलेले आहेत परंतु या क्रीडा संकुलात कुठल्याही प्रकारचे साहित्य नाही त्यामुळे क्रीडा प्रेमींची निराशा होत आहे. सेलू तालुक्यामध्ये 95 गावे असून या तालुक्याच्या तालुकास्तरीय स्पर्धा होण्यासाठी शासनाने एक वर्ष पूर्वी दिलेल्या साहित्याची मागणी वारंवार क्रीडा कार्यालयाकडे…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : शहरातील व्यंकटेश नगरातील श्री व्यंकटेश्‍वर मंदिरात शुक्रवारी (दि.15) रोजी कार्तिक पोर्णिमा देव दिवाळी निमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आला. या वेळी दहा हजार पणत्यांनी व्यंकटेश्‍वर मंदिरासह परिसर उजळून निघाला. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कार्तिक पोर्णिमा देव दिवाळी निमित्त या संस्थांच्या वतीने दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता आयोजित केलेल्या या सोहळ्यास हभप माधवराव आजेगांवकर, वेदशास्त्रसंपन्न प्रमोदशास्त्री कुलकर्णी, संस्थांचे अध्यक्ष सर्वोत्तम पाथरीकर, सौ. सुनिता आनंद भरोसे, आनंद पाटील, मनोहर गुरु मिरखेलकर, इंजि. शंकरराव आजेगांवकर आदी उपस्थित होते. यावेळी मंदिरावर सुंदर अशी रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिरासह मंदिर परिसरात भक्तांनी दहा हजारांवर पणत्या लावल्या. त्यामुळे हा संपूर्ण परिसर…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे होमपीच आहे. या जिल्ह्यानेच सातत्याने हिंदुत्वास कौल दिला आहे. या निवडणूकीतसुध्दा सामान्य जनता हिंदुत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल. बालेकिल्ल्यावर भगवाच फडकेल व हिंदुत्व पूर्णतः विसरलेल्या ठाकरे गटास भानावर आणेल, असा विश्‍वास खा.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या निवडणूक प्रचारार्थ खासदार शिंदे यांची शुक्रवारी (दि.15) परभणीत जिंतूर रस्त्यावरील अन्नपूर्णा लॉन्सवर भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवार भरोसे, माजी खासदार अ‍ॅड. सुरेश जाधव पाटील, जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे, माजी जिल्हा प्रमुख राजू कापसे, प्रथम महापौर प्रताप देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष भास्करराव लंगोटे, माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे,…

Read More

परभणी (प्रतिनिधी)शहरातील व्यापाऱ्यांसाठी आ.राहुल पाटील यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे, शासनाकडे पाठपुरावा केला. शहरातील व्यापारी बांधवांच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी आ. डॉ.राहुल पाटील यांनी कायम सहकार्य केले.त्यामुळे व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांना भक्कम पाठिंबा देत असल्याचे महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी आज मेळाव्यात बोलताना जाहीर केले. महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आ. डॉ.राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतर्फे संवाद मेळाव्याचे आयोजन अक्षदा मंगल कार्यालयात गुरुवारी (दि.14) सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, आ.डॉ. राहुल पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आ. सुरेश देशमुख, माजी आ.विजय गव्हाणे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, मानवी हक्क अभियानाचे मिलिंद आव्हाड, ज्येष्ठ विधीज्ञ…

Read More