परभणी (प्रतिनिधी) शुक्रवार दि 15 नोव्हेंबर रोजी येथील अन्नपूर्णा लॉन्स येथे खा श्रीकांत शिंदे यांची सभा महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती. यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीच्या वतीने खा. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महायुती चे उमेदवार आनंद भरोसे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी संदर्भात बोलताना संयोजक स्वप्नील पिंगळकर म्हणाले की सकल ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी मागील अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या हितासाठी स्वतंत्र परशुराम महामंडळ स्थापन करण्यात यावे यासाठी आत्तापर्यंत अनेक निवेदन, आंदोलन व शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक अशा अनेक प्रकारे परशुराम महामंडळ मिळवण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने प्रयत्न केले होते. ब्राह्मण समाजाला स्वतंत्र…
Author: Lok Sanchar
पाथरी,(प्रतिनिधी) : पाथरी विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगांकरीता निवडणूक विभागाद्वारे गृहभेटीद्वारे टपाली मतदानास सुरुवात झाली असून गुरुवारी वाघाळा येथील 102 वर्षीयभीमराव घुंबरे व 95 वर्षीय श्रीमती पदमिनबाई भिमराव घुंबरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग व 85 वर्षा पुढील जेष्ठ नागरीकांचे घरोघरी जाऊन मतदान करून घेण्यासाठी 16 मतदान पथके रवाना झाली असून पाथरी विधानसभा मतदारसंघातील 528 ज्येष्ठ नागरिक व 48 दिव्यांग 48 मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्याची प्रक्रिया गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवसात राबविली जाणार आहे. पहिल्या दिवशी पथकातील सदस्यांनी विविध गावांना भेटी देऊन पात्र मतदारांचे मतदान प्रक्रिया करून घेतली. वाघाळा येथील भीमराव बाळाभाऊ घुंबरे…
परभणी (प्रतिनिधी) शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे यांचे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता नेते मंडळाच्या जाहीर सभा होत असून यातच महायुतीचे तसेच शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता खा. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अन्नपूर्णा लॉन्स जिंतूर रोड परभणी येथे या सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महायुती तसेच तसेच शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
परभणी, (प्रतिनिधी)- जिल्हयात विधानसभा निवडणुकीची मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस यंत्रणा व नोडल अधिकऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना निवडणूक निरीक्षकांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता निवडणूक निरीक्षक (सामान्य) संचिता बिष्णोई, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल, निवडणूक निरीक्षक (खर्च) राहूल मिश्रा, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या उपस्थितीत मतदान व मतमोजणी पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे व नोडल अधिकारी उपस्थित होते. तर…
परभणी (प्रतिनिधी) मतदानाची तारीख निकट येत असतानाच निवडणूक प्रचाराला आता वेग आला असून कॉर्नर बैठका मेळावे या सर्वांच्या माध्यमातून आ. डॉ. राहुल पाटील हे मतदारांशी संवाद साधत असून या मेळावा कॉर्नर बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे परभणी शहरातील विविध भागात महाविकास आघाडीच्या वतीने तथा शिवसेना उबाठा गटाच्या वतीने उमेदवार तथा आ. डॉ. राहुल पाटील यांच्या प्रचारानिमित्त कॉर्नर बैठका, मेळावे आयोजित केले जात आहेत. या द्वारे ठिकठिकाणी मतदारांच्या सोबत संवाद साधला जात आहे. शहरातील जुना पेडगाव येथील वैभव नगर येथे बोलताना डॉ. राहुल पाटील म्हणाले की सध्याच्या सरकारने फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी विविध योजना राबवल्या मात्र जनतेचे मूळ प्रश्न यावेळी त्यांना…
परभणी, (प्रतिनिधी) 85 वर्षांवरील व्यक्ती व दिव्यांग मतदारांसाठी परभणी विधानसभा मतदारसंघात आजपासून गृहभेट मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. स्वत: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी शहरातील प्रभावती नगर येथील रहिवासी कमलाकर कातनेश्वरकर (वय 93) व कुसुम कमलाकर कातनेश्वरकर (वय 87) यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी या दोघांनी मतदानाचा घरुनच हक्क बजावला. मौजे धर्मापूरी येथील दिव्यांग मतदार माधव प्रभाकर कदम यांचेही मतदान जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करुन घेण्यात आले. मतदान केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी या मतदारांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, टपाली मतदान कक्षप्रमुख गणेश चव्हाण, मंडळ अधिकारी विकास आगलावे व गृहभेट मतदान…
निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी यांनी रॅलीस दाखवली हिरवी झेंडी परभणी, (प्रतिनिधी)- लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जास्तीतजास्त मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, यासाठी स्वीपच्या माध्यमातून परभणी शहरात आज सकाळी काढण्यात आलेल्या मतदार जनजागृती मॅरेथॉन रॅलीस विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक संचिता बिष्णोई, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्यास अवश्य सांगावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले. स्वत: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी रॅलीमध्ये धावले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, स्वीपचे नोडल अधिकारी…
परभणी (प्रतिनिधी) : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या विविध विषयांवरील दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांच्या हस्ते या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात 200 पेक्षा अधिक दिवाळी अंक वाचण्यास मिळणार आहेत. याप्रसंगी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा कोषागार अधिकारी श्री. पाचंगे व प्रमुख पाहुणे केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य राहूल नितनवरे यांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या सर्व समावेशक दिवाळी अंकाचे अवलोकन केले व ग्रंथालयाने वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या 200 दिवाळी अंकांचा वाचनप्रेमींनी आस्वाद घ्यावा,…
परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी तर्फे घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजी नगर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत परभणी येथील बाल विद्या मंदिर हायस्कूल परभणीची कु. अवनी ओमप्रकाश काळे हीने १७ वर्षे वयोगट मुलीच्या बॉक्सिंग स्पर्धेत वजन गट ५७ते ६० यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाआहे. आणि तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल कु.अवनी तिचे पालक तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन.ए. झरकर, सचिव डॉ.विवेक नावंदर, मुख्याध्यापक अरुण बोराडे उप मुख्याध्यापक आर. जी.तुम्मेवार पर्यवेक्षक पी. व्ही. रूघे, बी.के कोपरटकर सौ. एस.एम.बोके सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेआहे. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
परभणी, (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी आज गुरुवारी, दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.15 वाजता परभणी शहरात जिल्हास्तरीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉनची सुरुवात सकाळी 7.15 वाजता शनिवार बाजार मैदान पासून ते पुढे नानलपेठ पोलीस स्टेशन-शिवाजी चौक-गांधी पार्क-आर.आर.टावर-विसावा कॉर्नर-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने राजगोपालचारी उद्यान येथे समारोप करण्यात आला. यावेळी मतदान जनजागृती साठी शपथ देण्यात आली. मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मॅरेथॉनमध्ये निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक संचिता बिष्णोई, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु…

