परभणी,(प्रतिनिधी) : मानवत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मुलीच्या विनयभंग प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शिवाजी कारभारी शिंदे यास पोक्सो कायदा कलम 8 अन्वये तीन वर्षे कैद, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा तर भादंवि कलम 506 अंतर्गत सहा महिने कैद, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. मानवत पोलिस ठाण्यात 30 मे 2023 रोजी एक तक्रार दाखल झाली होती. त्यातून तक्रारकर्त्याने मुलगी व मुलगा एका किराणा दुकानावरुन सामान घेवून घरी परतत असतांना आरोपी शिवाजी कारभारी शिंदे याने तुच्या मापाचे कपडे आले आहेत, मला तुझे…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) शहरातील कलावंताच्या प्रमुख मागणी, समस्या या आजपर्यंत शासन दरबारी आ. डॉ. राहूल पाटील यांनी मांडल्या आहेत. यात नवीन नाट्यगृह निर्मीतीमध्ये त्यांनी विशेष प्रयत्न केले. वेळोवेळी निधीसाठी पाठपुरावा केला. आगामी काळात या नाट्यगृहासाठी निधी आणण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन या प्रसंगी डॉ.विवेक नावंदर यांनी उपस्थितांना दिले. शहरातील स्थानिक कलावंताची बैठक वैष्णवी मंगल कार्यालयात रविवार (दि.11)रोजी पार पडली. या बैठकीस विजय करभाजन, किशोर पुराणिक, पांचाळ, सूकते, संजय पांडे, कुलकर्णी, उपेंद्र दुधगावकर, संकेत पांडे, चांदजकर यांच्यासह शहरातील कलावंत उपस्थित होते. स्थानिक कलावंतांनी परभणी शहराचे नाव जगभरात आपल्या कलेच्या माध्यमातून पोहचविले आहे. त्यांना विविध बाबींची सुविधा परभणी शहरात उपलब्ध करुन देण्यासाठी…
परभणी, (प्रतिनिधी)– विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुकीशी संबंधित विविध कक्षांना भेट देऊन कामाकाजाची पाहणी केली. श्री. गावडे यांनी निवडणूक साहित्य कक्षाची पाहणी करताना साहित्य वाटपाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. सर्व साहित्य वेळेत संबंधित स्थळी पोहोचविण्याची दक्षता घेण्यास सांगितले. टपाल मतपत्रिका, आचारसंहिता कक्षाचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यम कक्षाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. कक्षामध्ये सुरु असलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे कामकाज, मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांच्या कामाकाजाचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, संतोषी देवकुळे, जिल्हा माहिती…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.10) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आणि व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी पर्ची यंत्र) मशीनच्या पेअरिंगची प्रक्रिया पार पडली. त्यानिमित्त सकाळी 11.20 वाजता स्ट्राँग रूमचे सील उमेदवारांच्या उपस्थितीत उघडण्यात आले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परभणी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसिलदार अनिकेत पालेपवाड, मास्टर ट्रेनर सुभाष काचगुंडे आणि परभणी महानगरपालिका सहआयुक्त प्रज्ञावंत कांबळे हे उपस्थित होते. मतदारसंघात लढणार्या उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी देखील या प्रक्रियेची साक्ष दिली. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन पेअरिंगची…
परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र शिक्षक पात्र परीक्षा 2024 चे आयोजन आज रविवारी दिनांक 10 रोजी दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात 9 केंद्रावर पेपर-1 तर दुपारच्या सत्रात 12 केंद्रावर पेपर- 2 ची परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षा केंद्रावर उपस्थित विद्यार्थ्यांची उपस्थिती ओळख ही बायोमेट्रिक फेस रिकग्निशन याद्वारे घेण्यात आली. पेपर 1 साठी सकाळी 9 वाजता तर पेपर 2 साठी दुपारी 2 वाजता परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे मोबाईल इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल आधी जमा करण्यात आली सकाळच्या सत्रात 9 केंद्रांवर एकूण 3326 पैकी 3119 परीक्षार्थीनी परीक्षा दिली त्यावेळेस 207 परीक्षार्थी अनुपस्थितीत होते. तर दुपारच्या सत्रात…
पालम (प्रतिनिधी) दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला गोपाष्टमीचा सण साजरा केला जातो. यावेळी ही तिथी ९ नोव्हेंबर, शनिवारी संपन्न झाली. या दिवशी गायींसह वासरांची पूजा केली जाते.जरी हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो, परंतु मथुरा, वृंदावनमध्ये त्याची रौनक पाहण्यासारखी असते या दिनी सवत्स गोपूजन करण्यात येते श्री सद्गुरु बाळकृष्ण गोशाळा पालम येथे सायंकाळी गोसेवकांच्या वतीने गोपुजन करण्यात आले. यावेळी श्री सद्गुरु बाळकृष्ण गोशाळा पालम चे सचिव गोसेवक अविनाश देविदासराव जोशी पालमकर यांच्या वतीने मंत्रोच्चार युक्त संकल्प करून सवत्स गौपूजन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम गोमाता संकल्प, गोमाता पूजन करून गोमातेस गोग्रास अर्पण करण्यात आला व गोआरती करण्यात आली…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या (गट-क) अध्यक्षपदी संतोष किशनराव निंबरे तर प्रमुख कार्यवाहपदी अमृत विक्रम कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. वसमत रस्त्यावरील भाग्य नगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात रविवारी (दि.10) सकाळी 11 वाजता परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. महासंघाचे उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष प्रमोद कदम हे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीतून 2024 ते 2029 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी निंबरे, उपाध्यक्षपदी सतीश विठ्ठलराव देशमुख (हिंगोली जिल्हा), सचिन गंगाराम भालेराव, सचिन बालासाहेब घुले, प्रमुख कार्यवाह म्हणून अमृत विक्रम कदम, सहकार्यवाह दीपक सोपानराव पंढरकर, कोषाध्यक्ष राजेश गणपतराव काळे, सहकोषाध्यक्ष…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी म्हणजे माझे होम पिच आहे, इथं येणं एक मजा आहे. तुम्ही आहातच तसे, असे नमूद करतेवेळी गद्दारी झाली परंतु, आ. पाटील असो, खा. जाधव व परभणी जिल्हावासीयांनी गद्दारीचा तो किडा गडाला लागू दिला नाही. लोकसभेतून प्रचंड मताधिक्याने विजय दिला आता विधानसभा निवडणूकीतसुध्दा तेवढ्याच मताधिक्याने चारही उमेदवार निवडणून द्या, असे आवाहन शिवसेनेचे (उबाठा) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना (उबाठा) तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील जिंतूर रोड वरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (दि.09) रात्री आयोजित केलेल्या जाहीर सभेप्रसंगी पक्षप्रमुख ठाकरे बोलत होते. यावेळी…
परभणी (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व भारतीय खेल प्राधिकरण यांच्याकडून परभणी येथे चालणाऱ्या खेलो इंडिया टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना गणवेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे टेबल टेनिस खेळाडू चेतन सुरवसे हे उपस्थित होते त्याचबरोबर बी रघुनाथ महाविद्यालयाचे उपप्राचार्य माधव पाटील आणि भारत सव सवंडकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमात टेबल टेनिस खेळाडूंना ट्रॅक सूट टी-शर्ट शॉट्स आणि शूज यांचे वाटप जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हे वाटप खेळाडूंच्या स्पर्धेतील सहभाग स्पर्धेतील निकाल दररोजच्या सरावातील उपस्थिती या आधारावर देण्यात आले. या खेळाडूंमध्ये…
दुसरे प्रशिक्षण पूर्ण ; कर्मचाऱ्यांची तयारी अंतिम टप्प्यात परभणी (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे दोन सत्रामध्ये प्रशिक्षण येथील कृषी विद्यापीठात संपन्न झाली या प्रशिक्षणात 46 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणासाठी दांडी मारली अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणार आहे या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे , श्रीमती के हरिता , निवडणूक निरीक्षक यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे ,नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड,गणेश चव्हाण,अनिता वडवळकर,जिल्हा स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे,उमाजी बोथीकर, आम्रपाली कासोदकर, एम. ए. क्षीरसागर, विष्णू पकवाने, दिपक नागरगोजे आदींची उपस्थिती होती.मुख्य सभागृहाच्या समोर…

