Author: Lok Sanchar

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024; परभणी, (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दि. 8 नोव्हेंबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजता मतदान यंत्राची (ईव्हीएम-व्हीव्हीपॅट) द्वितीय सरमिसळ (Second Randomization) जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांच्या, तसेच मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्य पक्षाचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांच्या समक्ष होणार आहे. या द्वितीय सरमिसळ (Second Randomization) साठी उपस्थित राहण्याबाबत सर्व उमेदवारांना कळविण्यात आलेले असून ईव्हीएम-व्हीव्हीपॅट विषयक सर्व प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्याचप्रमाणे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) प्रत्यक्ष पाहण्यासाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) जिल्हयात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली. परभणी जिल्हयातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक तयारीचा आढावा विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर, उपायुक्त अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर…

Read More

परभणी(प्रतिनिधी) आज मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 रोजी परभणी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात 96-परभणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या 15 उमेदवारांच्या खर्च नियमनासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी दुपारी 3 वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक मा. निवडणूक खर्च निरीक्षक  राहुल मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महत्त्वाचे म्हणजे, या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादेत 12 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ही मर्यादा 28 लाख होती, जी आता वाढवून 40 लाख रुपये करण्यात आली आहे. यावेळी परभणीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ…

Read More

परभणी (प्रतिनिधी) ग्रामीण भागात गाई म्हशींसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा देणाऱ्या तज्ञांची उणीव भासत असल्याकारणाने अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या तज्ञांचा अनुशेष दूर करण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ,नागपूर आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ मल्टीपर्पज आर्टिफिशियल इन्सिमिनेशन टेक्निशियन अर्थात मैत्री संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे तीन महिन्याच्या मैत्री प्रशिक्षणाचे समारोह आज दिनांक 6.11. 2024 रोजी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.अनिल भिकाने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सुधीर राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रशिक्षणासाठी 60…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी परभणी व नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती व्हावी व मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ऑनलाइन होणार असून शालेय गट इयत्ता 8 ते 10वी व महाविद्यालयीन गट इयत्ता 12 ते पदवी स्तर या गटात होणार असून विजेत्यांना परितोषिके देणार आहेत. तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटासाठी ‘मतदाराचे अधिकार आणि कर्तव्ये’, ‘मतदार राजा जागा हो…’, ‘आई बाबा! तुम्ही मतदान कराच..’ हे तीन विषय असणार आहेत. तर महाविद्यालयीन गटासाठी ‘जागृत नागरिक…

Read More

*पूर्वतयारी आढावा बैठकीत आयोगाचे निर्देश* छत्रपती संभाजीनगर:- निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले. येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार, उपसचिव सुमनकुमार, संजयकुमार, अभिलाष कुमार, अनिलकुमार, अविनाशकुमार तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास…

Read More

परभणी (प्रतिनिधी) मूळ परभणीचे रहिवाशी असलेले प्रसिद्ध गायक तथा संगीतकार विक्रम अशोक परळीकर यांचे मंगळवार दि 5 राजी रात्री 9.00 वाजता मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, मृत्यूसमयी ते 55 वर्षांचे होते सुरवातीचे शिक्षण सुरमणी डॉ.कमलाकर परळीकर यांच्याकडे, नंतर मुंबईत पंडित अजित कडकडे यांच्याकडे झाले. नवी मुंबईत खारघर भागात ते स्वामी समर्थ संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. अनेक दिग्गज गायकांसोबत परळीकर यांनी साथ संगत केली तर अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमात सादरीकरण केले. कवी शाम यांनी लिहिलेल्या रचनांच्या ध्वनिफीत त्यांनी तयार केल्या असुन सलग दोन वेळेस तेरा तास दीर्घ गायनाचा त्यांचा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समावेश करण्यात आलेला…

Read More

परभणी ( प्रतिनिधी) परभणी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात 96-परभणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या 15 उमेदवारांच्या खर्च नियमनासाठी मंगळवार, 5 नोव्हेंबर  रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी दुपारी 3 वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक निवडणूक खर्च निरीक्षक राहूल मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महत्त्वाचे म्हणजे, या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादेत 12 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ही मर्यादा 28 लाख होती, जी आता वाढवून 40 लाख रुपये करण्यात आली आहे. यावेळी परभणीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ संदीप…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : दिवाळी सण आनंदाचा, उत्साहात चा, प्रकाशाचा. सर्वत्र दिवाळी चा सण साजरा होत असताना,  गोरगरिबांच्या दिवाळी पण आनंदात जावी या साठी ‘चलो जलाए दीप वहां जहां अभी अंधेरा हैं’ या उक्तिप्रमाणे येथील स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून गरीब व गरजू कुटूंबांना शिधा वाटप करण्यात आला. जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर हे सर्व कुटूंब पाल ठोकून राहतात. या कुटूंबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने स्वामी विवेकानंद मित्रमंडळाच्यावतीने शिधा वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, गणेश निर्वळ पाटील, मिलिंद भोगवकर, वैभव मदनराव होगे, शंकर रोड़े ,गोपाल शर्मा, संतोष वहवाल, अविनाश चक्रवार, प्रवीण…

Read More

परभणी (प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे परभणी विधानसभेतील उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे सोमवारी एका पत्राद्वारे त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांना शिवसेना शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून यंदा विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आले. 2014 प्रमाणे यावेळेसही आनंद भरोसे यांची थेट लढत महाविकास आघाडी तथा उबाठा गटाचे डॉ.राहुल पाटील यांच्याशी होणार आहे. दरम्यान आनंद भरोसे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली असून त्यांच्या प्रचाराची पूर्ण धुरा प्रचार प्रमुख म्हणून राजू कापसे यांना देण्यात आली आहे.

Read More