परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र शिक्षक पात्र परीक्षा 2024 चे आयोजन आज रविवारी दिनांक 10 रोजी दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात 9 केंद्रावर पेपर-1 तर दुपारच्या सत्रात 12 केंद्रावर पेपर- 2 ची परीक्षा घेण्यात आली.
यावेळी परीक्षा केंद्रावर उपस्थित विद्यार्थ्यांची उपस्थिती ओळख ही बायोमेट्रिक फेस रिकग्निशन याद्वारे घेण्यात आली. पेपर 1 साठी सकाळी 9 वाजता तर पेपर 2 साठी दुपारी 2 वाजता परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे मोबाईल इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल आधी जमा करण्यात आली
सकाळच्या सत्रात 9 केंद्रांवर एकूण 3326 पैकी 3119 परीक्षार्थीनी परीक्षा दिली त्यावेळेस 207 परीक्षार्थी अनुपस्थितीत होते. तर दुपारच्या सत्रात 12 केंद्रांवर एकूण 4124 पैकी 3870 परीक्षार्थी उपस्थित होते यावेळेस 254 परीक्षार्थी अनुपस्थित होते. सकाळच्या सत्रात सकाळी 10 ते 10-10 या वेळेत परीक्षार्थींना प्रवेश देण्यात आला सकाळी 10.30 ते 1 या दरम्यान परीक्षा तर दुपारच्या सत्रात दुपारी 2.30-ते 5 या वेळेत परीक्षा घेण्यात आली. परीक्षा दरम्यान परभणी जिल्हा परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांनी यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सूचना केल्या तसेच परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा सुरळीत असल्याची खात्री करून घेतली. (छाया- उत्तम बोरसुरीकर)



