परभणी, (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी आज गुरुवारी, दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.15 वाजता परभणी शहरात जिल्हास्तरीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
मॅरेथॉनची सुरुवात सकाळी 7.15 वाजता शनिवार बाजार मैदान पासून ते पुढे नानलपेठ पोलीस स्टेशन-शिवाजी चौक-गांधी पार्क-आर.आर.टावर-विसावा कॉर्नर-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने राजगोपालचारी उद्यान येथे समारोप करण्यात आला. यावेळी मतदान जनजागृती साठी शपथ देण्यात आली.
मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मॅरेथॉनमध्ये निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक संचिता बिष्णोई, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. (छाया- उत्तम बोरसुरीकर)


