परभणी,(प्रतिनिधी) : येथील पाथरी रोडवरील एस.डि.मेसॉक फाउंडेशन संस्थेच्या सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालय व पोस्ट ग्रॅज्युऐट रिसर्च सेंटर मध्ये 12 नोव्हेंबर रोजी बी.डी.एस. या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या 100 विद्यार्थ्यांचा स्वागत व व्हाईट कोट सेरेमनी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष व संचालक डॉ. प्रफुल्ल पाटील व संचालिका डॉ. सौ. विद्या प्रफुल्ल पाटील उपस्थितीत होते. संस्थेच्या बी.डी.एस. (100 विद्यार्थी क्षमता), एम.डी.एस.(28 विद्यार्थी क्षमता), डॉ. प्रफुल्ल पाटील बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालय (60 विद्यार्थी क्षमता) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे या सोहळ्याद्वारे स्वागत करण्यात आले.
दंत शल्यचिकित्सा या वैद्यकीय शाखेच्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचा आगळा-वेगळा पायंडा डॉ.प्रफुल्ल पाटील यांनी सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रफुल्ल पाटील हे होते. डॉ.पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास संस्था सचिव तथा माजी मनपा सदस्या डॉ. सौ.विद्या प्रफुल्ल पाटील, अधिष्ठाता डॉ.सौ. मंगला राकारेड्डी, नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य जयंत देशमुख, चीफ वार्डन तथा उपअधिष्ठाता प्रो.डॉ.अर्चना जटानिया, डॉ.उज्ज्वला माकणे, डॉ.नम्रता पाटील, डॉ.विनिता मुरगड, डॉ.भरत देवसरकर, डॉ.सोनिया निरस, डॉ.रेणू पांडे, डॉ.अपुर्व सोनी, डॉ. संध्या राठोड, डॉ.पल्लवी दाशेटवार, डॉ.किरण सोनटक्के, प्रशासकीय अधिकारी पवन मिलखे, शिवाजी जारे, अनंत मिलखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. प्रफुल्ल पाटील म्हणाले कि, दंतवैद्यकीय शाखा अधिक लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे आपात्कालीन सेवा व अहोरात्र सेवा या क्षेत्रात अपेक्षित नसल्याने डॉक्टर खाजगी व्यक्तिगत आयुष्यात अधिक चांगल्या पद्धतीने एमडी, एमएस., डॉक्टरच्या मानाने व्यतीत करतात. डॉक्टर होण्याची संधी ही एक वैश्विक संधी असुन डॉक्टर हि व्यक्ती जगात कोठेही जावून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू शकते. ही या व्यवसायाची वैश्विक उपलब्धी आहे, असे प्रतिपादन डॉ. पाटील यांनी केले.
दंत वैद्यकीय शाखेकडे अधिक कल निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील 29 दंत महाविद्यालयांपैकी नॅक मुल्यांकित असलेले परभणीचे दर्जेदार महाविद्यालय म्हणून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी कॅप राउंड्स मध्ये परभणी डेंटल कॉलेजला प्राधान्य दिले व 100 जागा प्रवेशित झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.विद्या पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात नवीन प्रवेशित विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


