परभणी (प्रतिनिधी) AR STUD FARM च्या वतीने आज रविवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता परभणी शहरातील लक्ष्मी नगरी येथे देशपातळीवरील घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ए.आर स्टुडं फर्मच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य मैदान तयार करण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना पहिल बक्षीस 81 हजार रोख , 500 ग्राम चांदी मेडल , दुसरं बक्षीस 61 रोख, 300 ग्राम चांदी मेडल, तिसर बक्षीस 41 रोख , 200 ग्राम चांदी मेडल आणि प्रोत्साहन पर अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,खासदार संजय जाधव , आ. डॉ राहुल पाटील , महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान , सय्यद अब्दुल खादर , माजी सभापती गुलमीर खान , डॉ विवेक नावंदर, दीपकराव देशमुख, स्कायलाईन कन्स्ट्रक्शनचे मेहराज सिद्दिकी , आदींची उपस्थिती होती.
या स्पर्धेतील पहिले पारितोषिक घोडा एकता एक्स्प्रेस – मालक – सय्यद फहरान – मोतीहारी बिहार – घोडेस्वार – मनीष दुसरं बक्षीस – घोडा बागी – मालक विवेका पहेलवान – घोडेस्वार शम्भूनाथ – बिहार तिसरं पारितोषिक – शेलगाव यांनी पटकावला आहे. या स्पर्धेत देशातील गुजरात , मध्यप्रदेश ,उत्तरप्रदेश , बिहार ,लातूर , औरंगाबाद , परळी ,परभणी आदी ठिकाणातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत देशभरातील 50 घोड्यांनी सहभाग नोंदविला. रुबाबदार , देखने आणि बलाढ्य घोडे परभणीकरांना पहावयास मिळाले. या स्पर्धा पाहण्यासाठी परभणीकरांची मोठी गर्दी झाली होती. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान , सय्यद अब्दुल खादर, स्पर्धा यशस्वीतेसाठी ए.आर स्टुडं फर्मचे अब्दुल रज्जाक , सय्यद अबू हसन , आदींसह फर्मच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी नवनिर्वाचित आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान , सय्यद अब्दुल खादर , ए.आर स्टुडं फर्मच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आले. (छाया- संजय घनसावंत)


