परभणी (प्रतिनिधी) पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे वांगी येथे दिनांक 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2025 दरम्यान घेण्यात येत आहे. या शिबिरामध्ये पशुसंवर्धन विभाग व पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत पशुरोग निदान व उपचार शिबिराचे दि. 9 फेब्रुवारी रोजी मौजे वांगी येथे आयोजन करण्यात आले.
या शिबिरा दरम्यान जनावरांना मोफत जंतनाशक, औषधोपचार व लसीकरण करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. के. के. खोसे यांनी केले. या शिबिरामध्ये पशुसंवर्धन विभागाचे डॉ. कनले डॉ. धमगुंडे तसेच महाविद्यालयातील तज्ञ अधिकारी डॉ. चेपटे, डॉ. सिद्दिकी, डॉ. मिरा साखरे डॉ. रसाळ, डॉ. माने यांनी उपचार व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये एकूण 108 जनावरावर उपचार व लसीकरण करण्यात आले.


