परभणी (प्रतिनिधी) सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. सत्य वृत्त प्रसिध्द करणाऱ्या पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हा खुनी हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. अशा आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
समाजहितैषी पत्रकारिता करत असतांना पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होणे हे घात आहे. पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचा परभणी जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत असून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर परिषद प्रतिनिधी सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके,कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, कोषाध्यक्ष मोईन अहेमद खान, सहसंघटक अनिल दाभाडकर, माणिक शिंदे, नजीर खान, संघपाल आढागळे, संजय बगाटे, संजय घनसावंत, बाळासाहेब घिके, रियाज कुरेशी,सय्यद इस्माईल,सुनिल कोकरे, राहुल वहीवाळ, तय्यब पठाण, शैलेश डहाळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.



