परभणी,(प्रतिनिधी) : ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनी रितिका दीपकराव कदम व ऋतुजा गजानन सामाले यांची परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विज्ञान वारीसाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना रविवारी मान्यवरांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांच्यातील संशोधक चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी या हेतूने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉक्टर रामेश्वर नाईक यांचे अध्यक्षस्थानी असलेल्या परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी मार्फत विज्ञान वारीचे आयोजन केले विद्यार्थी निवडण्याकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये ज्ञानसाधना नीट आणि जेई फाउंडेशनच्या वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेला संघ हा पुणे येथील अवकाश संशोधन संस्थेला भेट देणार आहे.
विज्ञान वारीत निवड झाल्याबद्दल ज्ञानसाधना प्रतिष्ठान संस्थेचे संस्था अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के, संस्था सचिव प्राचार्या सौ. शितल सोनटक्के यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले.


