परभणी, (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकूळे, तहसीलदार संदिप राजपुरे, नायब तहसिलदार आणि महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सह दुय्यम निबंधक बी.एस.घुगे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*-*-*-*-*


