परभणी,(प्रतिनिधी) : येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त बुधवारी (दि.09) सायंकाळी खंडोबा बाजार येथील मराठवाडा हायस्कूलच्या प्रांगणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत भव्य मशाल रॅली काढण्यात आली.
या मशाल रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या या मशाल यात्रेत कार्यकर्ते पेटती मशाल हातात घेऊन अग्रभागी होते. यावेळी विद्यार्थी परिषद जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम्, जय श्री राम वगैरे घोषणांनी प्रमुख चौकांसह रस्ते दणाणून गेले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात या मशाल यात्रेचा समारोप झाला. यावेळी विद्यार्थी परिषदेचे विभागीय संघटन मंत्री शुभम स्वामी, शहर संघटन मंत्री सुशांत एकुर्गे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


