परभणी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आणि युवा मोर्चा परभणी महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने “नशामुक्त भारत” हा संदेश युवकांनमध्ये पोहचविण्यासाठी आयोजित “नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा” मोठ्या उत्साहात पार पडली.

सदरील मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात छ. शिवाजी महाराज स्मारक येथून करण्यात आली होती. हि स्पर्धा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये हजारो युवक-युवंतीचा व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेचा शुभारंभ राज्याचे माजी राज्यमंत्री सुरेशराव वरपुडकर, आयोजक भाजपा परभणी महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे व युवा मोर्चा अध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

यात परभणी महानगरातील ३२०० युवक-युवंतीनी ऑनलाईन नोंदणी व ६४८ युवक-युवंतीनी ऑफलाईन नोंदणी केली होती. सदरील मॅरेथॉन स्पर्धा ५ गटात विभागण्यात आलेली होती. स्पर्धेनंतरचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सदरील कार्यक्रमाचे आयोजक श्री. शिवाजी भरोसे यांच्या अध्यक्षतेखाली आनंद माध्यमिकविद्यालय, पिंगळी रोड, परभणी येथे संपन्न झाला.
या वेळी विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेचे पंच प्रमुख प्रा.डॉ. माधव शेजूळ, क्रीडा शिक्षक कैलास माने, राजेश शहाणे, कैलास टेहरे, विजय गारकर, माणिक कदम, पी.आर. जाधव सर, माधवराव शिंदे व इतर क्रीडा शिक्षकांनी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता प्रयत्न केले.
खुला गट पारितोषिक विजेते : 1) दत्ता आढाव 2) प्रतीक पवार 3) शेख साद 4) त्र्यंबक मस्के 5) सुदाम चुडावकर, 6)आदिनाथ सोळंके 7) दीपक काचगुंडे 8) सोपान रोडगे 9) प्रथमेश बामणे 10) सुरज भालेराव.
14 ते 17 वर्ष गट मुले पारितोषिक विजेते: 1) वैभव तरंगे 2) सोपान पवार 3) कृष्णा बोराडे 4) व्यंकटेश डुबाकर 5)अजय राठोड 6) राजेश बेले 7) सावता गव्हाणे 8) एकनाथ हारकळ 9) कृष्णा भोसले 10) अनन्य जावळे.
10 ते 14 वर्ष गट मुले पारितोषिक विजेते: 1) अर्जुन भालशंकर 2) शंकर भालेराव 3) कन्हैया खटिंग 4) सुदर्शन आवचार 5) योगेश बोबडे 6) वैभव भालेराव 7) योगेश टिपरे 8) धनराज खंदारे 9) विक्रम भालेराव 10) रुद्र जामगे.
14 ते 17 वर्ष गट मुली पारितोषिक विजेते: 1) रोहिणी भोरे 2) सुलभा डोंबे 3) सुहानी जाधव 4) पुजा यादव 5) साक्षी चौधरी 6) साक्षी घाटगे 7) प्रतीक्षा गायकवाड 8) श्रेया देशपांडे 9) विद्या वरकड 10) शीतल पौंधे.
10 ते 14 वर्ष गट मुली पारितोषिक विजेते: 1) संस्कृती आव्हाड 2) यशस्वी वाघ 3) गौरी ढोणे 4) दिशा देशमुख 5)क्रांती गाढवे 6) शामल रोडगे 7) किरण सोळंके 8) अपेक्षा पांचाळ 9) प्रतीक्षा खवणे 10) मिनाक्षी बानायत.
यावेळी डॉ. केदारजी खटिंग, माजी नगराध्यक्ष कमल किशोरजी अग्रवाल सरचिटणीस एन. डी. देशमुख, भालचंद्रजी गोरे, मंगलताई मुद्दगलकर, शंकर आजेगावकर, रितेश जैन, प्रशांत सांगळे मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी, सुरज चोपडे, विजय गायकवाड, हम्मु चाऊस, सिकंदर खान, मनिषा जाधव, रुपाली ठाकरे, डॉ. नम्रता पाटील, प्रभावती अन्नपूर्वे, छाया मोगले, उमेश शेळके, मनोज पोरवाल, प्रविण गायकवाड, गणेश टाक, ऐश्वर्य वरपूडकर, दिनेश नरवाडकर, दिपक शिंदे, मो. गौस, सिकंदर, अनंत बनसोडे, किशनसिंग टाक, अद्वैत पार्डीकर, शुभम सपकाळ, अतुल लंगोटे, यांच्या सह भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व खेळाडू उपस्थित होते . मॅरेथॉनमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


