परभणी : (प्रतिनिधी)राष्ट्राच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करणारे, विकासाचा नवा इतिहास रचणारे, जगासमोर भारताचे सामर्थ्य दाखवणारे आणि “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या मंत्राने देशाला एकत्र करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येत आहे.

या निमित्ताने आनंद विद्यालय, परभणी येथे रक्तदान शिबिर व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला होता आणि या शिबिरात तो संकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला. एकूण ७६ रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून सेवा-यज्ञात सहभाग नोंदविला.
या प्रसंगी आयोजक भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, प्रेरणाताई वरपुडकर, डॉ. केदार खटिंग, डॉ. मनोज पोरवाल, डॉ. मंजुषा नरवाडकर, डॉ. नम्रता पाटील यांच्यासह बाळासाहेब जाधव, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, सरचिटणीस ॲड. एन.डी. देशमुख, भालचंद्र गोरे, मंगलताई मुद्दगलकर, शंकर आजेगावकर, रितेश जैन, प्रशांत सांगळे, अजिंक्य गोंडेस्वार, सुमित भालेराव, मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी, सुरज चोपडे, विजय गायकवाड, हम्मु चाऊस, सिकंदर खान, मनिषा जाधव, रुपाली ठाकरे, प्रभावती अन्नपूर्वे, छाया मोगले, उमेश शेळके, प्रविण गायकवाड, गणेश टाक, ऐश्वर्या वरपुडकर, दिनेश नरवाडकर, दिपक शिंदे, मो. गौस, अनंत बनसोडे, किशनसिंग टाक, अद्वैत पार्डीकर, शुभम सपकाळ, अतुल लंगोटे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते, बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.


