परभणी,(प्रतिनिधी) आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या परभणी येथील आर. पी. हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात एक नवा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी (हृदयरोग) विभागाने आज यशस्वीरित्या २००० कॅथ लॅब प्रक्रिया पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे या सर्व शस्त्रक्रिया व प्रक्रिया शासकीय योजनांच्या अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आल्या असून, यामुळे रुग्णांवरील मोठा आर्थिक भार टळला आहे.
केवळ परभणीच नव्हे, तर हिंगोली, धाराशिव, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, नांदेड आणि बुलढाणा या ८ हून अधिक जिल्ह्यांतील गंभीर रुग्ण उपचारासाठी आर. पी. हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. येथे त्यांच्यावर वेळेत आणि यशस्वी उपचार करून त्यांना जीवनदान देण्यात आले आहे.
कोरोनरी अँजिओग्राफी १५६७ रुग्णांची तपासणी यशस्वीरीत्या करण्यात आली,परक्यूटेनियस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी ३७७ रुग्णांवर अत्यंत अवघड अशी अँजिओप्लास्टी करण्यात आली,पर्मकॅथ ३५ रुग्णांना किडनी उपचारादरम्यान याचा लाभ मिळाला, एट्रियल सेप्टल डिफेक्ट ४ रुग्णांवर यशस्वी प्रक्रिया, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट २ रुग्णांचे प्राण वाचवण्यात आले, पेटंट डक्टस आर्टीरिओसस ४ रुग्णांवर यशस्वी उपचार, पर्मनंट पेसमेकर इम्प्लांटेशन ४ रुग्णांच्या हृदयाचे ठोके नियमित करण्यासाठी पेसमेकर बसवण्यात आले, पेरीकार्डिओसेंटेसिस टॅपिंग (हृदयाभोवती साचलेले पाणी काढणे) ३ रुग्णांवर ही तातडीची प्रक्रिया करण्यात आली, रोटाब्लेशन परक्यूटेनियस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी २ अत्यंत गुंतागुंतीच्या केसेस यामध्ये यशस्वी करण्यात आल्या,कार्डियाक रिसिंक्रोनायझेशन थेरपी विथ डिफिब्रिलेटर १ रुग्णावर ही अत्याधुनिक प्रक्रिया पार पडली. तसेच ब्लड प्रेशर व्हेरिएबिलिटी (रक्तदाबातील चढउतार) १ रुग्णावर याद्वारे विशेष देखरेख व उपचार करण्यात आले.
गरजू रुग्णांवर वेळेत योग्य उपचार करून आवश्यक असणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY), प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) तसेच लेबर कार्ड च्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत.
“हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आपत्कालीन स्थितीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे गरजेचे असते. आमच्या कार्डिओलॉजी विभागाने २४ तास तत्पर राहून अनेक अतिधोकादायक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. असे आर. पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी यावेळी सांगितले. या संपूर्ण मोहिमेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, कार्डिओलॉजी विभाग डॉ. दीपक कुबडे तसेच मेडिसिन विभागाचे डॉ. सलाम तांबोळी, डॉ. शहाजी बोडखे, डॉ. संतोष हरकळ, डॉ. दैठणकर, डॉ. भुक्कड आदी सहभागी झाले होते.या सर्वांचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी अभिनंदन केले.


