सेलू,(प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून एका 20 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सेलूत उघडकीस आला असून, याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
एका आरोपीने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे भासवून लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर लग्न झाल्याचा विश्वास निर्माण करून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार शहरातील एका लॉजमध्ये तसेच आरोपींच्या राहत्या घरी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींसह एका महिलेने तिला नकार दिला. तसेच जातिवाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गणेश परमेश्वर इंगोले, परमेश्वर बाबासाहेब इंगोले आणि अनिता परमेश्वर इंगोले (रा. सालगाव, ता. परतूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक अरुण नागरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पुंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे करीत आहेत.
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


