प्रशिक्षण कार्यक्रम ; विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा
परभणी, (प्रतिनिधी)– लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभागात असणाऱ्या बीएलओंना एसआयआर च्या कामात सहकार्य करून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पूनरिक्षण जनजागृतीचे काम हाती घ्यावे. मतदार यादी सखोल पुनरीक्षण जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची साथ महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Summary Revision – SSR/SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवाजी महाविद्यालयात विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वंयसेवक विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक यांच्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादी विशेष सखोल पूनरीक्षण कार्यक्रम प्रशिक्षण कार्यशाळा सोमवार दिनांक 13 जुलै रोजी उत्साहात पार पडली.
यावेळी मार्गदर्शक म्हणून तहसीलदार डॉ.संदीप राजपूरे यांची उपस्थिती होती.तसेच यावेळी विशेष सखोल पूनरीक्षन नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे,श्री शिवाजी महाविद्यायाचे उपप्राचार्य एन.एन.राऊत यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेत तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी मतदार नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती, पत्ता बदल, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, बीएलओची भूमिका तसेच नागरिकांच्या मनातील विविध शंकांचे सविस्तर निरसन केले.तसेच मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील महत्वाच्या प्रश्नांची (FAQ) माहिती देण्यात आली.
नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती, ऑनलाइन सेवा, विशेष मोहीम दिवस, ई-ईपीआयसी, अर्जाचे प्रकार आणि पडताळणी प्रक्रिया याबाबत देखील तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविकातून नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय स्वंयसेवक विद्यार्थ्यांना विशेष सखोल पुनरिक्षन कार्यक्रमाची आपल्या परिसरात जनजागृतीचे काम कशा पद्धतीने करावे याबाबतीत सांगितले.सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी केले.
प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण पथकातील मोहन आल्हाट, अरविंद शहाणे, रामप्रसाद अवचार, प्रफुल्ल शहाणे यांच्यासह विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.डॉ.तुकाराम फिसफिसे, प्रा.डॉ.गणपत भिसे,प्रा.डॉ.नसीम बेगम, प्रा.माणिक कदम. प्रा.योगेश कुऱ्हाडे, प्रा.डॉ.सुरेश भालेराव, प्रा.डॉ.सचिन खडके,साळवे आदींनी पुढाकार घेतला.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी,प्राध्यापक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***


