परभणी,(प्रतिनिधी) : दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशानुसार नांदेड विभागात तिकीट तपासणी अधिक प्रभावी करण्यासाठी 3 ऑगस्ट रोजी सकाळी 4.30 ते सायंकाळी 7.30 या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विनातिकीट प्रवास, अनियमित प्रवास आणि बुक न केलेले सामान अशा एकूण 1,087 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून 5 लाख 98 हजार 335 रुपये महसूल वसूल करण्यात आला.
ही मोहीम हजूर साहिब नांदेड-आदिलाबाद, हजूर साहिब नांदेड-परभणी-जालना-छत्रपती संभाजीनगर-मनमाड, परभणी-परळी वैजनाथ तसेच पूर्णा-अकोला या मार्गांवर राबविण्यात आली. मोहिमेत 32 तिकीट तपासणी पथक कर्मचारी, 149 तिकीट तपासनीस, 14 स्टेशन तपासणी कर्मचारी, 4 विभागीय वाणिज्य निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) 3 कर्मचारी सहभागी झाले होते. या कालावधीत एकूण 29 रेल्वे गाड्यांची सखोल तपासणी करण्यात आली.
कारवाईदरम्यान विनातिकीट प्रवासाची 516 प्रकरणे नोंदवून 4 लाख 4 हजार 590 रुपये, अनियमित प्रवासाची 157 प्रकरणे नोंदवून 1 लाख 17 हजार 310 रुपये, तर बुक न केलेल्या सामानाची 414 प्रकरणे नोंदवून 76 हजार 435 रुपये महसूल वसूल करण्यात आला. याशिवाय, अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध 5 प्रकरणांमध्ये 10 हजार रुपयांचा दंड, तर अस्वच्छता करणार्यांविरुद्ध 4 प्रकरणांमध्ये 1 हजार 100 रुपयांचा दंड आकारण्यात आला. धूम्रपानाशी संबंधित कोणतेही उल्लंघन आढळून आले नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मोहिमेदरम्यान प्रवासी तसेच विक्रेते आणि फेरीवाल्यांना जन विश्वास अधिनियमातील प्रमुख तरतुदींबाबत जनजागृती करण्यात आली. रेल्वे प्रशासन आणि नागरिकांमध्ये सकारात्मक व सहकार्यपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने हे समुपदेशन करण्यात आले.
दक्षिण मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे, प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगण्याचे आणि रेल्वे नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी, रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Tuesday, August 4
ताज्या बातम्या:
- परभणीच्या. गोल्ड मेडलिस्ट यासीन खान मुजफ्फर खानची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सुवर्ण कामगिरी
- 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण; हर घर तिरंगा’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी विविध विभागांना सूचना
- नांदेड रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; एका दिवसात 1,087 प्रकरणे, सुमारे सहा लाखांचा दंड वसूल : 29 गाड्यांची तपासणी
- दर्गा रोड परिसरातून पाच गायींसह वासरू चोरट्यांनी केले लंपास : कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
- अवघ्या सहा तासांत घरफोडीचा छडा; दोन सराईत चोरटे जेरबंद : पिंगळीतील 2 लाख 9 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत; ताडकळस पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत 20 हून अधिक तंत्रज्ञांचा वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेत प्रवेश
- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
- बेपत्ता तरुणीची माहिती देण्याचे आवाहन


