परभणी ( प्रतिनिधी) संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त तसेच देशाचे लाडके पंतप्रधान. नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने गुरु रविदास महाराज भवन तथा प्रबोधन केंद्र, एम.आय.डी.सी. परिसर, परभणी येथे चर्मकार समाज मेळावा, भव्य आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा तसेच संरक्षण भिंतीच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास समाजबांधव, मान्यवर, लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष. शिवाजीराव भरोसे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमोलजी वाघमारे (गुरु रविदास वाणीचे अभ्यासक) यांनी उपस्थितांना गुरु रविदास महाराजांचे विचार, गुरुवाणीतील संदेश तसेच सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी भालचंद्र गोरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना समाजातील युवकांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन समाजाची उन्नती साधावी, असे आवाहन केले. प्रमुख अतिथी म्हणून सौ. प्रभावतीताई अन्नपूरे, मोतीरामजी कांबळे, भगवानराव असेवार, डॉ. भगवान अस्वारकर, प्रा. रमा शेजावळे, सौ. मनीषा जाधव, उमेश शेळके, डॉ. मनोज पोरवाल, डॉ. मंजुषा नरवाडकर, सौ. अपर्णा जोशी, सौ. दिपाली वाघ, अंकुश जोगदंड यांची उपस्थिती लाभली.
यावेळी समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा साडी वाटप करून सन्मान करण्यात आला. बालकांचे संगोपन, पोषण व महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला व औषध वितरण करण्यात आले. तसेच आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. डॉ. नरवाडकर व डॉ. पोरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.कार्यक्रमादरम्यान. शिवाजीराव भरोसे यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या गुरु रविदास महाराज भवन तथा प्रबोधन केंद्र परिसरातील संरक्षण भिंतीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या संरक्षण भिंतीमुळे परिसराच्या सुरक्षिततेत वाढ होणार असून समाजोपयोगी कार्यासाठी केलेल्या या योगदानाबद्दल उपस्थितांनी भरोसे यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रामकिसनजी कांबळे, सुग्रीव ठोंबरे, मुंजाजी शेवाळे, नरहरी सोनवणे, दीपक कटारे, प्रभाकर गायकवाड, भगवानराव गोरे, वैजनाथ लोंढे, महादू शिंदे, ज्ञानेश्वर आस्वार, मुरली ठोंबरे, प्रकाश हिंगे, हरिभाऊ घुमरे, अनिल नांदुरे, रामकिशन तीखे, अशोक शिंदे, तुकाराम गायकवाड, शिवाजी हराळे, गोपीचंद गुरव, रामेश्वर सुरवसे, मुंजाभाऊ पानझडे, प्रमोद वीरकर, राजेश केंद्रेले, पांडुरंग शिंदे, वसंतराव पाखरे यांच्यासह समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन एम. जी. शेवाळे सर यांनी केले, तर दीपक कटारे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थितांनी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.


