परभणी, (प्रतिनिधी) : शिक्षकांनी केवळ कर्मचारी म्हणून काम न करता विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी अधिकाधिक वेळ द्यावा. देशाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या विकसित भारतासाठी सक्षम आणि गुणवंत विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

जिल्हा परिषद परभणीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आज परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात उत्कृष्ट शिक्षक, आदर्श शिक्षक, जि.प. आदर्श शाळा पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा लता विजयकुमार वाकळे, अकोला येथील बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर , जिल्हा व ग्रामीण विकास यंत्रणा डॉ.स्मिता पाटील, जि.प. उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती श्रीकांत भोसले (विटेकर),जि.प. शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती वैशाली पंकज जाधव, जि.प. समाज कल्याण सभापती श्रीमती पार्वतीबाई मुंढे, जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्रीमती ऐश्वर्या अजय चव्हाण , जि.प. कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा सभापती श्रीमती कौशल्याबाई शिंदे,जि. प.मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन पक्वाने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण जि.प.सदस्य सुचिता भरोसे, जोत्सना घाडगे , श्रीमती मनीषा पारवे ,रितेश काळे ,संग्राम जामकर ,डॉ.संजय रोडगे,पांडुरंग खिल्लारे , मुंजाभाऊ धोंडगे आदीसह सर्व जि.प.सदस्य यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, मराठवाड्यात गावागावांत उत्कृष्ट, आदर्श आणि सुंदर शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता त्यांच्यातील कल्पकता आणि कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जात आहे. स्किल इंडिया आणि नवीन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यात उद्योजक बनण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे.
जिल्हा परिषदांच्या शाळांमधूनही गुणवंत विद्यार्थी घडत आहेत. त्यासाठी ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समित्यांनी शाळांच्या विकासाकडे लक्ष द्यावे.
जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के शाळांमध्ये डिजिटल लॅबची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाकडून आवश्यक सोयी-सुविधा दिल्या जात आहेत.
शिक्षकांनी या सुविधांचा योग्य वापर करून ज्ञान, कौशल्य आणि संस्कारांनी परिपूर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम करावे.
श्री. स्वामी म्हणाले की, शिक्षकांना देशाची उज्वल पिढी घडवण्याचे काम आणि गुरुचं गुरुजी पण सिद्ध करण्याचे काम करायचं आहे. आपली संस्कृती , परंपरा आणि महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजले पाहिजे. माझी शाळाच माझा धर्म, कर्म समजून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा संकल्प शिक्षकांनी केला पाहिजे. शिक्षकाशिवाय प्रगती होणार नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेणारे शिक्षक व्हा.
कार्यक्रमात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील दोन वर्षातील 18 उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, दोन विशेष शिक्षक पुरस्कार, 9 आयडॉल शिक्षक पुरस्कार , 9 आदर्श जिल्हा परिषद शाळा पुरस्कार आणि नवोदय एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंझुर्के यांनी केले. सुत्रसंचलन प्रेमेंद्र भावसार, मयूर जोशी, ज्योत्स्ना पालमकर ,संतोष सेलुकर,सारिका गिरी यांनी तर आभार माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. सविता बिर्गे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी योजना संजय ससाने, उपशिक्षणाधिकारी गोविंद मोरे, शौकत पठाण , अब्दुल नजीब अब्दुल मुजीब , गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे ,उमेश राऊत,मुकेश राठोड,प्रगती नेवल,रोहिणी पवार ,शालिनी किरकन ,किरण सुरोडवार,सुभाष आम्ले,सुनील तोष्णीवाल,मंगेश नरवाडे , बी.व्ही. कापसिकर, पोले सर्व शिक्षण विस्तार अधिकारी ,अधिकारी व कर्मचारी आदीसह जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने परिश्रम घेतले.
२७ शिक्षक पुरस्कार; २ विशेष शिक्षक पुरस्कार; ९ आदर्श शाळा पुरस्कार
*विशेष शिक्षक पुरस्कार*
श्रीमती राधा विलासराव भिसे जि.प.प्रा.शा.लोहरा, श्रीमती अर्चना अनंतराव भारस्वाडकर जि.प.प्रा.शा. साडेगाव
*सन २०२५ चे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार*
श्रीहरी सुदामराव पवार (गंगाखेड), संजय वसंतराव पक्वाने (मानवत), निलेश कुमार मुंजाजी पांचाळ (सेलू), भागवत ज्ञानोबा पालमटे( पालम), खोब्राजी रामकिशन वाळवटे (परभणी), सुशीलकुमार सुधाकर वाघमोडे (सोनपेठ), मारोती भुजंगराव कदम (पूर्णा), सोपान नाथराव खताळ (जिंतूर ),पृथ्वीराज उत्तमराव धर्मे (पाथरी).
सन २०२६ चे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार*
दशरथ बाबुराव मुंढे (गंगाखेड), सुभाष हरिभाऊ सानप (जिंतूर ), गोपाळ रामराव गायकवाड (मानवत) , सतीश एकनाथराव कांबळे (पालम) , ज्ञानेश्वर विष्णू वाघमारे( परभणी) , भारत बाबुराव सावने (पाथरी) , बळीराम रामदास कदम( पूर्णा) , सदानंद शंकरराव देशमाने ( सेलू) , बाबासाहेब देविदासराव कराड (सोनपेठ),
आयडॉल शिक्षक पुरस्कार*
सुशील सुधाकर वाघमोडे (सोनपेठ), उमाकांत बाबुराव हाडूळे (मानवत) , पृथ्वीराज उत्तमराव धर्मे (पाथरी) , पप्रकाश मल्लिकार्जुन मोहकरे (मानवत) , काझी नसीरोद्दिन (सोनपेठ ), संजय वसंतराव पक्वाने(मानवत), रावसाहेब संभाजी उगले( पूर्णा), श्रीमती संचेती उमाकांत शेटे (परभणी) , माधव लिंबाजीराव गव्हाणे (सेलू )
***


