परभणी (प्रतिनिधी) देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, सुशासन आणि जनकल्याण अभियानांतर्गत भाजपा परभणी महानगरच्या वतीने शहरातील विविध शाळांमध्ये चित्रकला, निबंध, वकृत्व आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या कला, विचारशक्ती आणि वक्तृत्व कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. शिवाजी भरोसे यांनी विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळाला असून शैक्षणिक वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भाजपा परभणी महानगरच्या वतीने करण्यात आले.


