परभणी,(प्रतिनिधी) : वसमत रस्त्यावरील स्नेह शारदा नगरातील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उपासना मंडळाच्या वतीने 22 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री विष्णुसहस्रनाम पारायण सोहळ्याची सांगता शनिवार 28 नोव्हेंबर रोजी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन, पारायण प्रवचन आणि महाप्रसादाने होणार आहे, अशी माहिती ज्ञानेश्वरी पारायण सेवेकरी सोपानराव डाळ व प्रल्हादराव ऊर्फ पी.जी. देशमुख यांनी दिली.
हा सांगता सोहळा स्नेह-शारदानगर येथील श्री गजानन महाराज मंदिर संस्थान व श्री महालक्ष्मी मंदिर संस्थानच्या संत मंडपात होणार आहे. या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व विष्णुभक्त बालाजी तुंगेनवार, ह.भ.प. दादाराव महाराज भालके आणि भागवताचार्य ह.भ.प. एकनाथ महाराज पांचाळ सावळीकर यांनी केले.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उपासना मंडळाचे संकल्पक विष्णुभक्त ह.भ.प. बालाजी महाराज तुंगेनवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत आहे. यासाठी ज्ञानेश्वरी पारायण सेवेकरी सोपानराव डाळ, रेणुकादास पाचपोर, माणिकराव राऊत, पी.जी. देशमुख, शिवाजीराव झाडे, नामदेवराव डाळ, घ्यार साहेब रनेर, कालिदास गुरु भोगावकर, किशनराव पोपळघट, प्रभाकर सराफ, रमाकांत तम्मेवार, ज्ञानोबा कदम, मारोतराव चव्हाण, खटिंग सर तसेच ज्ञानेश्वरी पारायण प्रचारक नितीन जाधव गोगलगावकर यांच्यासह अनेक सेवेकरी परिश्रम घेत आहेत.
महिला मंडळाच्या वतीने शीलाताई कदम, वंदनाताई वाडकर, मालतीताई देशमुख, जयश्री कदम-पवार, मिराबाई लोकलवार, रेखाताई कदम, अनुसयाबाई चौके, शीलाताई देशमुख, उमरीकर मॅडम, डाळताई, खरातताई, बनसोडे ताई, किल्लेदार मॅडम, विभुते ताई आणि मोरे ताई यांच्यासह महिला भाविकांचे सहकार्य लाभत आहे.या सांगता सोहळ्यास ज्ञानेश्वरी पारायण करणार्या महिला-पुरुष भाविकांनी तसेच परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळ, सर्व अन्नदान यजमान, श्री गजानन महाराज मंदिर संस्थान व श्री महालक्ष्मी मंदिर संस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे.


