पालम (प्रतिनिधी )
पालम येथील सर्व मुस्लिम समाजातर्फे व मुस्लिम इन्साफ कॉन्सलन्स परभणी तर्फे दि11/10 रोजी पालम तहसील कार्यालयाला दोन घंटे धरणे देऊन निवेदन देण्यात आले
या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या मुस्लिम समाजाचे गुरु मोहम्मद सल्लल्लाहू अले व सल्लम यांच्या विषयी जाणून बुजून अपशब्द बोलून विटंबना करणाऱ्या रामगिरी महाराज व नरसिंहानंद सरस्वती महाराज व नितीन राणे यांनी मुस्लिम समाजाला व मुस्लिम समाजाच्या गुरूंना अपशब्द बोलून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहे व वकफ संशोधन बिल 2024 पर्यंत घेण्यात यावा व वरील तिन्ही दोषीवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात यावी व सर्व मुस्लिम समाजाच्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य करावे याकरिता पालम तहसील मार्फत मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले जर या मागण्या सरकारने या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळात सर्व मुस्लिम समाज लोकशाही मार्गाने हे आंदोलन तीव्र करण्यात येईल व कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाला तर याची सर्व जबाबदारी सरकारची राहील याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी व वरील तिन्ही दोषींना UAPA अंतर्गत तात्काळ अटक न केल्यास येणाऱ्या शुक्रवारी दिनांक 18/ 10/ 24 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून रामगिरी महाराज यांचे गाव सरला बेट तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील व परभणी जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाज समजावून सांगण्यासाठी जाणार आहेत तरी आपण वरील मजकुरांची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी असे निवेदन पालम तहसील कार्यालयात देण्यात आले या निवेदनावर शेरखान पठाण सलमान खान पठाण सरान खान पठाण शेख नवीद शेख आसिफ इत्यादींच्या सह्या आहेत हे निवेदन देताना पालम येथील सर्व मुस्लिम समुदाय उपस्थित होता