सेलू ( प्रतिनिधी) श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालयातील विवेक विष्णू इंगोले याची 14 वर्षा आतील क्रिकेट स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशाचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. युवा पिढी क्रिकेटमध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा आदर्श व क्रिकेट भोवती निर्माण झालेले वलय पाहून विद्यार्थी क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी धडपडत आहेत. असाच ज्ञानतीर्थ विद्यालयातील विवेक विष्णू इंगोले याने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी केली असून त्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्याचे पुढील स्वप्न राष्ट्रीय संघामध्ये खेळण्याकडे आहे. विवेक हा उत्कृष्ट गोलंदाज असून त्याचे कौशल्य क्रीडा शिक्षक श्री. दीपक जोरगेवार यांनी ओळखले. त्याला योग्य प्रशिक्षण दिले. त्याच्या या यशासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत व यापेक्षाही चांगला खेळ करून यश संपादन करावे असे ते म्हणाले.


