परभणी,(प्रतिनिधी) :
परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी या चार विधानसभा मतदारसंघात शनिवारी (दि.23) होणार्या असून चारही मतदारसंघातील 1623 मतदान केंद्रातील मतमोजणी साठी 56 टेबल वर 118 फेऱ्या होणार आहेत. तर पोस्टल साठी 28 टेबल असणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.21) सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून जिल्हाधिकारी गावडे यांनी मतमोजणी संदर्भातील संपूर्ण तपशील जाहीर केला. जिंतूर मतदारसंघातील मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात, परभणीतील मतमोजणी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात, गंगाखेडातील मतमोजणी संत जनाबाई महाविद्यालयात तर पाथरीतील मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. या मतमोजणीकरीता आयोगाने 4 उच्चपदस्त अधिकार्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. चारही मतदारसंघात एकूण 1 हजार 623 मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीकरीता 56 टेबल असणार असून मतमोजणीच्या फेर्यांची संख्या 118 असणार आहे. पोस्टल मतमोजणी व ईटीपीबीएस मतमोजणीकरीता स्वतंत्र टेबल असणार आहेत. मतमोजणीसाठी नेमण्यात आलेले मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि सुक्ष्म निरीक्षक यांचे रॅन्डोमायझेशन करण्यात येवून विधानसभा निहाय कर्मचारी यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रावर मोबाईल किंवा कोणतीही ईलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास परवानगी नसणार आहे. या केंद्रांवर निवडणूक विभागाने पुरविलेल्या पासेस किंवा आयोगाकडील पासेस असल्याशिवाय अन्य कोणासही प्रवेश मिळणार नाही. कार्यालयीन किंवा नेहमीच्या ओळखपत्रावरही प्रवेश असणार नाही. ईव्हीएमची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात 14 टेबलवर होणार आहे. सर्व ईव्हीएम (सीयू)ची मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी ड्रॉ पध्दतीने निवडलेल्या पाच मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅट पेपर स्लिपची मतमोजणी एका टेबलवर क्रमांने होणार आहे.
या मतमोजणी कक्षात निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक, पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश असणार आहे. सकाळी 5 वाजता मतमोजणी केंद्रांवर सर्व कर्मचार्यांना हजर रहावे, असे आदेश दिल्या गेले आहेत. सकाळी 7 वाजता स्ट्राँग रुम उघडल्या जाणार आहेत. निवडणूक प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित रहावे, असे अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


