परभणी,(प्रतिनिधी) : तालुक्यातील संबर येथे सोमवारी (दि.9) पहाटे चारच्या सुमारास अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने त्याठिकाणी कारवाई करत ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात आणून लावला आहे.

या कारवाईमध्ये महसूल सेवक ज्ञानेश्वर बुलबुले, माणिक गिरी, हनुमान राऊत, आकाश मोरे, रामेश्वर कनले व वाहन चालक अशोक कुर्हे यांनी केली. रेतीचे उत्खनन करताना आढळून आलेला स्वराज कंपनीचा केणीसह ट्रॅक्टर उपविभागीय अधिकारी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने जप्त करून तहसील कार्यालयांमध्ये लावला आहे, अशी माहिती नायब तहसीलदार विष्णु पकवाने यांनी दिली. (छाया- उत्तम बोरसुरीकर)


