परभणी (प्रतिनिधी) ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ २०२४ कार्यक्रम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली दि.१० डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला श्रीमती अनुराधा ढालकरी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धैर्यशिल जाधव, आयुक्त महानगरपालिका, परभणी, संदीप घोंसीकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, परभणी, श्रीमती आशा गरुड, शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, परभणी, संदीप राजपुरे, तहसिलदार परभणी व इतर मान्यवर तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मा. जिल्हाधिकारी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी साहेब व इतर मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष, विविध माजी सैनिक संघटना यांचे वतीने करण्यात आला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे प्रास्ताविक झाले.

परभणी जिल्हातील ११ (आकरा) जवानांना आपले कर्तव्य बजावताना शहीदत्व प्राप्त झाले आहे या शहीदांच्या वीर पत्नी व वीर माता/पोता यांचा सत्कार मा. जिल्हाधिकारी साहेब हस्ते करण्यात आला. सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य् यांच्या व्दारे माजी सैनिक/ विधवा पत्नी यांच्या पाल्यांना कल्याणकारी निधीमधुन सात विदयार्थ्यांना गौरव पुरस्कार व शिक्षणासाठी आर्थिक मदत व शिष्यवृत्ती चे धनादेश माननियांच्या हस्ते देण्यात आले.


