पालम (प्रतिनिधी) परभणीत शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारकासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे मंगळवार दि.10 रोजी संध्याकाळी आवमान केला आहे. त्या समाजकंटकास प्रत्यक्षदर्शनी भीमसैनिकांनी चोक देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे
जिल्हा पोलीस प्रशासन पुढील तपास करीत असून याघडलेल्या प्रकरणाचे सपूर्ण जिल्ह्यामध्ये पडसाद उमटले असून ही घटना पालम शहरात व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठान बंद केले असुन शहरातील संविधान प्रेमींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येऊन या घटनेच्या निषेधार्थ दिनांक ११ रोजी सकाळी ११ वाजता बुद्ध विहार शनिवार बाजार पासून येथे एकत्र जमून शांती मोर्चा फळारोड ते पालम पिंपळगाव चौकतुन तहसील कार्यालय मार्ग शांती मोर्चा काढून तहसील. कार्यालयात शांती मोर्चा धडकला

यावेळी संविधान प्रेमी यांनी तमाम संविधान प्रेमी यांना मार्गदर्शन करताना ऍड. राहुल हत्तीआंबीरे,वैजनाथ हत्तीबीरे,निवृत्ती हत्तीबीरे,रोहिदास हनवते,गौतम हात्तीअंबिरे,जालिदर हात्तीअंबिरे,आजय राजो हात्तीअंबिरे,
इत्यादींनी मार्गदर्शन केले. ज्या व्यक्तीला पकडण्यात आलेला आहे तो व्यक्ती मातेफिरू किंवा नशापाणी करणारा व्यक्ती नसून तो कोणाचातरी सांगता असून त्याचा बोलवता धनी शोधण्यामध्ये पोलिसांनी कसर न करता त्या मागील व्यक्तीचा शोध घेऊन कायद्याचं रक्षण, व जगात कायदा भारताचा असल्यामुळे या संविधानाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोही कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील भीम अनुयायी यांनी राष्ट्रपतींना , मुख्यमंत्री,गृहमंत्री, पोलीस जिल्हा अधिकारी परभणी याना निवेदन पालम नायब तहसीलदार राजेश्वर पवळे, नायब विनोद पवार मार्फत देण्यात आले आहे.
या शांतीमोर्चात संविधान प्रेमी सह आंबेडकर समुदायासह सर्व सहभाग नोंदवीला यावेळी पालम तालुक्यातील सखारामजी हात्तीअंबिरे,सतोष हात्तीअंबिरे,जालिंदर हत्तीआंबीरे,
गणपत हतीआंबीरे, गौतम हत्तीआंबीरे, बाबासाहेब एगडे, नवनाथ हात्तीअंबिरे, संजय थिटे, देवानद हात्तीअंबिरे,रजित हात्तीअंबिरे, राहुल गायकवाड, गणेश हात्तीअंबिरे, लक्ष्मण गायकवाड, सलमान पठाण, सदानद हात्तीअंबिरे, काशिनाथ थिट्टे, शिवदर्शन हात्तीअंबिरे,आजय शिदे,सुदाम लोढे, बालाजी फुलपगार, सतीश बनसोडे, आजिम पठाण, लुक्का थिट्टे यांच्यासह तालुक्यातील संविधान प्रेमी भीम अनुयायी सह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. मोर्चा साठी पालम पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


