परभणी (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण आकृती पुतळ्या परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याप्रकरणी दुकानात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. मोठे नुकसान झाले ही घटना दुर्दैवी असून सर्वसामान्य व्यापारांचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब केले जातील व त्यासाठी प्रशासनावर दबाव आणून पाठपुरावा करण्यात येईल तसेच नुकसानीचे भरपाई मिळेपर्यंत हा पाठपुरावा चालूच राहील असे आश्वासन विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज(दि 12) परभणी येथे व्यापारांना दिले
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज गुरुवार दि.१२ रोजी परभणी येथे दाखल झाले. त्यांनी शहरातील उसळलेल्या दंगली दरम्यान नुकसानग्रस्त भागास भेट दिली. प्रथम त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर स्टेशन रोड विसावा कॉर्नर भागातील दगडफेकीसह जाळपोळीच्या घटना घडलेल्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. त्या पाठोपाठ स्टेशन रोड ,छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क अष्टभुजा मंदिर, आदी ठिकाणी जाऊन त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळेस बोलताना म्हणाले की सदरील घटना ही निषेधार्थ आहे मात्र त्यानंतर उसळलेली दंगल हा प्रकार फार गंभीर आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी आपण करणार असून व्यापाऱ्यांचे झालेले नुकसानीचे पंचनामे तसेच त्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिले .
यावेळी त्यांनी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार कोषाध्यक्ष अशोक माटरा यांच्यासह अन्य पदाधिकारी व प्रतिष्ठित व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकारी तसेच प्रभारी पोलिस अधीक्षक तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्यांशी गाठभेठ घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळेस त्यांच्यासोबत आ. डॉ. राहुल पाटील जिल्हाप्रमुख विशाल कदम डॉक्टर विवेक नावंदर अरविंद देशमुख रवी पतंगे प्रशास ठाकूर अनिल डहाळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


