परभणी,(प्रतिनिधी) परभणी येथील पेडगाव रस्त्यावरील आर.पी.हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे १ जानेवारी पासून सुरू असलेल्या शिबिर अंतर्गत १८० पेक्षा जास्त अँजियोग्राफी करण्यात आल्या असून एक अत्यंत अवघड अशी कटिंग बलून अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून रुग्णाचे प्राण वाचवण्यात आले आहेत.
आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आर.पी. हॉस्पिटल येथे एक जानेवारीपासून मोफत हृदयरोग तपासणी व उपचार शिबिर घेतले जात आहे या शिबिरात तपासणी केलेल्या एक ४५ वर्षांचा रुग्ण छाती दुखत असल्यामुळे आर पी हॉस्पिटल मध्ये दाखल झाला. तपासणी दरम्यान रुग्णाचा इ.सी.जी, व 2-डी इको करून घेण्यात आली. त्यात रुग्णावर तात्काळ अँजिओग्राफी करणे गरजेचे असल्याने नातेवाईकाला सांगून अँजीओंग्राफी केली. अँजीओंग्राफी रिपोर्ट मध्ये रुग्णाच्या रक्त वाहिन्यामध्ये अत्यंत कणखर असे कॅल्शिअम ब्लॉकेज अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले. रुग्णाला तत्काळ अँजोप्लास्टी करणे गरजेचे असल्याचे हॉस्पीटल मध्ये कार्यरत असलेले प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉ. दिपक कुबडे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना कल्पना दिली. रुग्णाची घरची परिस्थिती बेताची असल्या कारणाने त्या रुग्णाला योजने अंतर्गत कटिंग बलून अँजोप्लास्टी करून त्या रुग्णाला जीवनदान देण्यात आले. यामध्ये पेशंटच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम चे कटिंग वापरून अडथळा दूर करण्यात आला. हे ब्लॉकेजेस काढण्यासाठी (वूल्वरीन) कटिंग बलून स्टेन डॉ दिपक कुबडे व प्रसिद्ध डॉ शहाजी बोडके यांनी शस्त्रक्रिये दरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या सुरळीत करण्याची कठीण अशी कटिंग बलून अँजोप्लास्टी केली. सदरील एन्जोप्लास्टी करण्यासाठी रुग्णांना औरंगाबाद पुणे मुंबई सारख्या शहरात जावे लागत होते. ही समस्या कायमची सोडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अँजीओंग्राफी, अँजोप्लास्टी च्या सहाय्याने रुग्णांच्या हृदयासंबंधी समस्या कमी होण्यासाठी आर.पी. हॉस्पिटल येथे नुकत्याच चालू झालेल्या क्याथ लॅबचा फायदा होणार आहे व यामुळे बहुसंख्य रुग्णांचे जीव वाचू शकतात. असे आर.पी हॉस्पिटलचे व परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले. रुग्णाच्या नातेवाईकांनी आमदार डॉ. राहुल पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमीर तडवी यांचे आभार मानले.


