पालम (प्रतिनिधी) सोसिओ इकॉनॉमिक डेव्हलमेंट ट्रस्ट स्वप्नभूमी केरवाडी अंतर्गत “किशोरी मुलींचे सक्ष्मिकरण” प्रकल्पा अंतर्गत पालम तालुक्यातील एकूण २३ गावात गाव पातळीवर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. गाव पातळीवर प्रथम आलेल्या मुलींच्या आज अंतिम फेरीच्या स्पर्धा घेण्यात आल्या.ज्यामध्ये – इंग्लिश शब्द लिखाण, कविता पाठांतर या लहान – मोठ्या दोन्ही गटातील एकूण १७० मुली सहभागी होत्या. तसेच श्री. हृषिकेश शिंदे सर ( आयपीएस) गंगाखेड यांनी Cyber security या विषयावर ppt च्या माध्यमातून मुला मुलींना माहिती दिली.

आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गंगाखेड चे DYSP डॉ.श्री. दिलीप टिपरसे सर व आयपीएस श्री. शिंदे सर हे दोन्ही पाहुणे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी मुलींना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून रामकिशन आवळे व माणिक वाळके तसेच स्वप्नभूमीतील सौ. गंगाताई माने सारंग सर, प्रल्हाद पांचाळ, मनोज गडमवाड, राम लटपटे, विष्णू जाधव, गौळण शिंदे, शोभा कुलकर्णी, अनंता बोरकर, श्री. शिनगारे, रवि होनमाने व स्वप्नभूमीतील इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


